मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  MPSC Recruitment 2022: गट क पदांसाठी अधिसूचना जारी!लवकरच सुरु होणार अर्जप्रक्रिया

MPSC Recruitment 2022: गट क पदांसाठी अधिसूचना जारी!लवकरच सुरु होणार अर्जप्रक्रिया

Tejashree Tanaji Gaikwad HT Marathi
Jul 31, 2022 03:38 PM IST

MPSC Group C Notification 2022: या भरतीसाठीची अर्ज प्रक्रिया २ ऑगस्ट पासून सुरु होत आहे आणि अर्ज करण्याची अंतिम तारीख २२ ऑगस्ट २०२२ निश्चित करण्यात आली आहे.

नोकरीची संधी
नोकरीची संधी (HT)

MPSC Recruitment 2022: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) विविध गट C पदांच्या भरतीसाठी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. एमपीएससी ग्रुप सी भरती 2022 साठी उमेदवार २ ऑगस्ट २०२२ पासून mpsc.gov.in या अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करू शकतात. या पदांसाठी भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख २२ ऑगस्ट २०२२ निश्चित करण्यात आली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

‘या’ पदांसाठी होणार भरती

अधिकृत अधिसूचनेनुसार, या प्रक्रियेद्वारे दुय्यम निरीक्षक, उद्योग निरीक्षक, कर सहाय्यक, लिपिक टंकलेखक (इंग्रजी) आणि लिपिक टंकलेखक (मराठी) च्या २२८ पदांची भरती केली जाईल. गट C पदांसाठी भरतीसाठी निवड प्राथमिक परीक्षा आणि मुख्य परीक्षेच्या आधारे केली जाईल. ही प्राथमिक परीक्षा १०० गुणांची असेल आणि मुख्य परीक्षा २०० गुणांची असेल.

पात्रता काय ?

महाराष्ट्रातील गट सी पदांच्या भरतीसाठी, उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवीधर असणे आवश्यक आहे. याशिवाय दुय्यम निरीक्षक पदांसाठी किमान वय १८ वर्षे आणि कमाल वय ३८ वर्षे निश्चित करण्यात आले आहे. तर, इतर पदांसाठी वय १९ ते ३८ वर्षे दरम्यान असावे. तथापि, राखीव प्रवर्गातील उमेदवारांना सरकारी नियमांनुसार उच्च वयोमर्यादेत सवलत मिळेल. तपशीलवार माहितीसाठी तुम्ही अधिकृत अधिसूचना तपासू शकता.

‘असा’ करा अर्ज 

उमेदवार एमपीएससी ग्रुप सी भरती २०२२ साठी आयोगाच्या वेबसाइट mpsc.gov.in वर २ ऑगस्ट ते २२ ऑगस्ट २०२२ पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. यासाठी सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारांना ३९४ रुपये अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. अधिक तपशीलांसाठी आपण अधिकृत वेबसाइट तपासू शकता.

 

IPL_Entry_Point