मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Live News Updates 17 May 2023 : कर्नाटकचा सस्पेन्स अखेर संपणार, मुख्यमंत्र्यांच्या नावावर आज होणार शिक्कामोर्तब!

Live News Updates 17 May 2023(HT)

Live News Updates 17 May 2023 : कर्नाटकचा सस्पेन्स अखेर संपणार, मुख्यमंत्र्यांच्या नावावर आज होणार शिक्कामोर्तब!

03:55 PM ISTMay 17, 2023 09:25 PM Atik Sikandar Shaikh
  • twitter
  • Share on Facebook

Live News Updates 17 May 2023 : सिद्धरामय्या कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री असतील, अशी माहिती समोर आली आहे. तर डीके शिवकुमार उपमुख्यमंत्री असतील.

Wed, 17 May 202303:55 PM IST

संजय राऊतांनी २४ तासांच्या आत माफी मागावी - तुषार भोसले

त्र्यंबकेश्वर मंदिर प्रकरणी भाजपाच्या आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले यांनी शिवसेनेचे (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांना अल्टिमेटम दिला आहे. हिंदू महासभेने केलेल्या आरोपांनंतर संजय राऊतांनी त्र्यंबकेश्वर मंदिराला धूप दाखवण्याची परंपरा १०० वर्षे जुनी असल्याचा दावा केला. यानंतर आता तुषार भोसले यांनी संजय राऊतांकडे २४ तासात माफीची मागणी केली आहे. 

Wed, 17 May 202302:10 PM IST

जलयुक्त शिवारसाठी ५४५ कोटी तर प्रधानमंत्री कृषि सिंचन योजनेसाठी ४२५ कोटींची तरतूद

यंदा पावसाचे आगमन उशिराने असल्याने पावसाचे पाणी वाचवून ते आणि जमिनीत जिरवणे आवश्यक आहे. त्यासाठी जलयुक्त शिवार, प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना, गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार या योजना प्रभावीपणे राबवाव्यात. या योजनांच्या कामांना गती देण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. जलयुक्त शिवार योजनेसाठी ५४५ कोटी तर प्रधानमंत्री कृषि सिंचन योजनेसाठी ४२५ कोटींच्या निधीची तरतूद केल्याचेही  मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Wed, 17 May 202301:05 PM IST

ज्येष्ठ वकील आणि ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डचे सचिव  जफरयाब जिलानी यांचं निधन

ज्येष्ठ वकील आणि ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे सचिव जफरयाब जिलानी यांचे आज निधन झाले. ते ७३ वर्षांचे होते. दोन वर्षांपूर्वी, मे २०२१ मध्ये मेंदूतील रक्तस्त्रावामुळे ते आजारी होते. बाबरी मशीद अॅक्शन कमिटीचे ते संयोजक होते. या खटल्यात उच्च न्यायालयापासून सर्वोच्च न्यायालयात त्यांनी अनेक वर्ष वकील म्हणून काम पाहिले होते. लखनौ येथे जिलानी यांचा दफनविधी पार पडणार आहे.

जफरयाब जिलानी यांचं निधन
जफरयाब जिलानी यांचं निधन

Wed, 17 May 202311:27 AM IST

कर्नाटकः माजी मुख्यमंत्री सिद्धारमैय्या आणि डीके शिवकुमार राहुल गांधींना भेटले

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री, ज्येष्ठ कॉंग्रेस नेते सिद्धारमय्या आणि कर्नाटक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार आज दिल्लीमध्ये कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांना भेटले. कर्नाटकमध्ये कॉंग्रेसला दणदणीत बहुमत मिळाल्यानंतर एक दोन दिवसांमध्ये नव्या मुख्यमंत्र्यांचे नाव जाहीर केले जाणार आहे.

कर्नाटकः माजी मुख्यमंत्री सिद्धारमैय्या आणि डीके शिवकुमार राहुल गांधींना भेटले
कर्नाटकः माजी मुख्यमंत्री सिद्धारमैय्या आणि डीके शिवकुमार राहुल गांधींना भेटले

Wed, 17 May 202310:53 AM IST

अभिनेता प्रशांत दामले यांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट 

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष प्रशांत दामले यांच्यासह नाट्यकर्मी नाटक समूहाच्या विजयी सदस्यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सह्याद्री अतिथीगृहात सदिच्छा भेट घेतली. नुकत्याच पार पडलेल्या नाट्य परिषद निवडणुकीत नाट्यकर्मी नाटक समूहाला विजय मिळाला आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी विजयाबद्दल सगळ्यांना शुभेच्छा दिल्या. राज्यकर्ते म्हणून कोणतीही मदत लागल्यास ती करण्यास तयार असल्याचे सांगून या साऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी आशवस्त केले.

अभिनेता प्रशांत दामले यांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट
अभिनेता प्रशांत दामले यांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट

Wed, 17 May 202310:45 AM IST

वर्षभरात वीजचोरीची ४०८५ प्रकरणे उघडकीस १७५ जणांवर गुन्हे दाखल

 महावितरणच्या छत्रपती संभाजीनगर परिमंडलात गेल्या वर्षभरात वीजचोरीची ४०८५  प्रकरणे उघडकीस आली आहेत. यात ग्राहकांनी ६ कोटी ८४ लाख रुपयांची वीजचोरी केल्याचे आढळून आले आहे. या सर्वांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. १७५ प्रकरणांत वीजचोरी करणाऱ्यांवर पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Wed, 17 May 202310:47 AM IST

कर्नाटकचा सस्पेंस अखेर संपणार, मुख्यमंत्र्यांच्या नावावर अजूनही शिक्कामोर्तब नाही

गेल्या अनेक दिवसांपासून कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री कोण होणार यावर चर्चा सुरू होती. डीके शिवकुमार की सिद्धरामैया यापैकी कोण कर्नाटकचे मुख्यमंत्री होणार, याबाबत शिक्कामोर्तब करण्यात आल्याचे वृत्त आहे. सिद्धरामय्या कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री असतील, अशी माहिती समोर आली आहे. तर डीके शिवकुमार उपमुख्यमंत्री असतील.

Wed, 17 May 202308:32 AM IST

परमबीर सिंह यांचा वापर करून मला फसवण्यात आलं: अनिल देशमुख

परमबीर सिंह यांचा वापर करून मला फसवण्यात आलं: अनिल देशमुख

Wed, 17 May 202307:53 AM IST

रामनवमीला हिंसाचार झाला त्यावेळी एसआयटी का नेमली नाही?, राऊतांना फडणवीसांना सवाल

नाशिकच्या त्रंबकेश्वर मंदिरासमोर दोन गटात झालेल्या राड्याची एसआयटी चौकशीचे आदेश गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. त्यानंतर आता संभाजीनगरमध्ये रामनवमीला हिंसाचार झाला होता, त्यावेळी एसआयटी चौकशी का नेमली नाही?, असा सवाल करत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी फडणवीसांवर टिकास्त्र सोडलं आहे.

Wed, 17 May 202305:45 AM IST

PNG Zapurza :  जागतिक संग्रहालय दिनानिमित्त झपूर्झामध्ये उत्सवाची घोषणा

महाराष्ट्राच्या कला व संस्कृतीचा अविभाज्य भाग बनलेल्या झपूर्झा कला व संस्कृती संग्रहालयातर्फे झपूर्झा उत्सवाची घोषणा झाली आहे. खडकवासला धरणाजवळील कुडजे येथील ‘झपूर्झा’च्या वास्तूत उत्सव होत असून, यात संगीत, नाटक, अभिवाचन, शास्त्रीय गायन, विविध कार्यशाळा आदी कार्यक्रम होणार आहेत. पीएनजी सन्स व झपूर्झाचे संस्थापक अजित गाडगीळ उत्सवाबाबत म्हणाले, की संग्रहालयाची वर्षपूर्ती, जागतिक संग्रहालय दिवसाच्या (१८ मे) औचित्याच्यानिमित्तीने झपूर्झा उत्सव १३, १४ मे व १८, १९, २० व २१ मे रोजी होत आहे. उत्सवाच्या काळात सकाळी १२ पासून कलाप्रेमी व रसिकांनी ललित कला, चित्र, शिल्प व अन्य कला तसेच, कार्यशाळांचा आस्वाद घेता येईल. 

Wed, 17 May 202305:41 AM IST

Co working Space :  पुणेस्थित ईएफसी इंडियाचा अहमदाबादमध्ये विस्तार

ईएफसी (आय) लिमिटेड या भारतातील आघाडीची कार्यालयीन पायाभूत सुविधा आणि डिझाइन पुरवणारी कंपनी देशभरात विस्तार करत असून कंपनीने नुकताच गुजरातमध्ये प्रवेश केला. कंपनीने स्प्रिंट या आपल्या ब्रँडअंतर्गत अहमदाबाद येथे पहिली को- वर्किंग स्पेस सुरू केली आहे. नेहरू नगर येथे वसलेल्या या अत्याधुनिक ऑफिसमध्ये १००० सीट्सची क्षमता असून ते ५०,०००+ चौरस फुट क्षेत्रात वसले आहे. प्रसिद्ध कॉर्पोरेट कंपन्या स्प्रिंट अहमदाबादला पसंती देत असून त्यात टेक महिंद्रा, कोटक महिंद्रा बँक आणि झी एंटरटेनमेंट व अशा इतर कंपन्यांचा समावेश आहे.

Wed, 17 May 202304:52 AM IST

New York Stock Exchange : आज २३१ वर्षांपूर्वी झाली न्यूयाॅर्क स्टाॅक एक्सेंजची स्थापना

अमेरिकेतील न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंजची स्थापना आजच्याच दिवशी म्हणजे १७ मे १७९२ रोजी झाली. त्यादरम्यान २४ शेअर दलालांनी वॉल स्ट्रीटवरील ब्रिटनवूड करारावर स्वाक्षरी केली. न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंजचे नंतर ८ मार्च १८१७ रोजी न्यूयॉर्क स्टॉक आणि एक्सचेंज बोर्ड असे नामकरण करण्यात आले आहे. सध्या या बाजाराचे भांडवल हे २२. ६४७ ट्रिलियन अमेरिकन डॉलर्स इतके आहे.

Wed, 17 May 202304:51 AM IST

Shinde vs Vikhe : विखे ज्या पक्षात जातात त्या पक्षाच्या विरोधात काम करतात, राम शिंदेंचा गंभीर आरोप

Shinde vs Vikhe : खासदार सुजय विखेंनी भाजपा आमदार राम शिंदे यांच्या विरोधात पॅनल उभं केल्यामुळं भाजपातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले आहे. विखे पाटील ज्या पक्षात जातात, त्याच पक्षाच्या विरोधात काम करत असल्याचा गंभीर आरोप आमदार राम शिंदे यांनी केला आहे.

Wed, 17 May 202304:06 AM IST

Opening bell : निर्देशांकात नफावसूलीचे वातावरण, सेन्सेक्स निफ्टीत घट 

शेअर बाजारात आजच्या सकाळच्या सत्रात नफावसूलीचे वातावरण दिसून आले. निर्देशांक सपाट पातळीवर सुरू झाला. निफ्टी थोड्या वाढीसह १८३०० च्या अंशपातळीवर उघडला आहे. बँक निफ्टी उघडताच लाल चिन्हावर घसरला आणि ५२ अंकांच्या घसरणीसह व्यवहार करत होता. सेन्सेक्स आज ०.१५ अंकांच्या सपाट हालचालीसह ६१,९३२.३२ अंशांवर उघडला. काल तो ६१,९३२.४७ अंशाच्या पातळीवर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टी १३.९५ अंकांच्या किंचित वाढीसह १८,३००.४५ वर उघडला.

Wed, 17 May 202303:06 AM IST

मोखा चक्रीवादळाचा म्यानमारला तडाखा, आतापर्यंत ८१ लोकांचा मृत्यू

बंगालच्या उपसागरात आलेल्या मोखा चक्रीवादळाने बांगलादेश आणि म्यानमारमध्ये चांगलाच धुमाकूळ घातला आहे. शेकडो घरं पडली असून किनारी भागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. चक्रीवादळामुळं म्यानमारमध्ये आतापर्यंत तब्बल ८१ लोकांचा मृत्यू झाला असून मदत व बचावकार्य जारी आहे.

Wed, 17 May 202303:01 AM IST

फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट, ९ लोकांचा मृत्यू

पश्चिम बंगालमधील मिदनापूर जिल्ह्यातील एका फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेत आतापर्यंत ९ लोकांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले आहे.

Wed, 17 May 202303:01 AM IST

मुंबईतील वांद्रे परिसरात भीषण आग, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल

मुंबईतील वांद्रे परिसरातील नर्गिस दत्त रोडवरील झोपडपट्टीत भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. त्यानंतर आता अग्निशमन दलाच्या १० गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहे. या घटनेत कोणतीही जीवीतहानी झाल्याचं वृत्त अद्याप समोर आलेलं नाही.

Wed, 17 May 202302:50 AM IST

पाकिस्तानला गुप्त माहिती पुरवणाऱ्या प्रदीप कुरुलकरांची पॉलिग्राफ टेस्ट होणार

पाकिस्तानच्या आयएसआयला भारतीय संरक्षण दलाविषयीची गुप्त माहिती पुरवण्याच्या आरोपाखाली डीआरडीओचे संचालक प्रदीप कुरुलकर यांना काही दिवसांपूर्वीच अटक करण्यात आली आहे. त्यानंतर आता एटीएस आणि अन्य तपास यंत्रणांकडून त्यांची चौकशी केली जात आहे. प्रदीप कुरुलकर यांनी पाकिस्तानला नेमकी कोणती गुप्त माहिती पुरवली, याचा तपास करण्यासाठी एटीएसने त्यांची पॉलिग्राफ टेस्ट करण्याचा निर्णय घेतला आहे.

Wed, 17 May 202301:11 AM IST

भाजपाध्यक्ष जेपी नड्डा आजपासून महाराष्ट्र दौऱ्यावर

भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष जेपी नड्डा हे आजपासून दोनदिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर आले आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी राज्य कार्यकारिणीच्या बैठकीसह अनेक कार्यक्रमांना ते हजेरी लावणार आहे. मुंबई तसेच पुण्यातील भाजप कार्यकर्त्यांची नड्डा संवाद साधणार आहेत.

Wed, 17 May 202301:10 AM IST

Rahul Narvekar : शिवसेनेच्या सर्व आमदारांना नोटिसा देणार, राहुल नार्वेकरांचं वक्तव्य

Rahul Narvekar : शिवसेनेतील सर्व आमदारांना नोटीसा दिल्या जाणार असून उत्तरासाठी सात दिवसांचा कालावधी दिला जाणार असल्याचं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केलं आहे. जून २०२२ आणि सध्या शिवसेना पक्षावर कुणाचं वर्चस्व आहे, याबाबतची माहिती निवडणूक आयोगाकडून मागवण्यात आल्याचंही नार्वेकर म्हणाले.