मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Live News Updates 29 May 2023: राष्ट्रवादी काँग्रेसकडून सावित्रीबाई फुले व अहिल्यादेवी होळकर यांच्या अपमानाचा निषेध

Live News Updates 28 May 2023 (HT)

Live News Updates 29 May 2023: राष्ट्रवादी काँग्रेसकडून सावित्रीबाई फुले व अहिल्यादेवी होळकर यांच्या अपमानाचा निषेध

03:12 PM ISTMay 29, 2023 08:42 PM Ashwjeet Rajendra Jagtap
  • twitter
  • Share on Facebook

NCP protest in Mumbai : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या झालेल्या अपमानाचा निषेध म्हणून मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शिंदे सरकार विरोधात आंदोलन करण्यात आलं.

Mon, 29 May 202303:05 PM IST

मराठवाड्यात वीजपुरवठा खंडित होण्याच्या प्रमाणात लक्षणीय घट

मराठवाड्यात २०२१-२०२२ या वर्षात विविध कारणांनी १ लाख ८० हजार ९५८ वेळा ११ केव्ही वाहिन्यांचा वीजपुरवठा खंडित (इंटरप्शन्स) झाला होता. तथापि, महावितरणने काटेकोर नियोजन केल्याने २०२२-२३ या वर्षात केवळ ६३ हजार ६४ वेळा वीजपुरवठा खंडित झाला. इंटरप्शन्सचे प्रमाण ६५ टक्क्यांनी घटवण्यात महावितरणला यश आले आहे. याबरोबरच २०२१-२०२२ या वर्षात खंडित वीजपुरवठ्याचा एकूण कालावधी ५ कोटी ६२ लाख ४९ हजार ४४९ ‍मिनिटे होता. तो २०२२-२३ या वर्षात ८२ टक्क्यांनी कमी करण्यात म्हणजे ९७ लाख ६१‍ हजार ३१६ ‍मिनिटांवर आणण्यात महावितरण यशस्वी ठरले आहे.

Mon, 29 May 202302:20 PM IST

पुणेः महिला कुस्तीपटूंना दिल्ली पोलिसांकडून झालेल्या मारहाणीचा राष्ट्रवादीकडून निषेध

दिल्लीत काल नवीन संसद भवनाचे उद्घाटन होत असताना केंद्रीय पोलीस दलाकडून ऑलम्पिक पदक विजेत्या कुस्तीपटूंना झालेल्या मारहाणीचा पुणे शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून निषेध करण्यात आला. शहरातील गोपाळ कृष्ण गोखले चौकात आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात ‘नरेंद्र मोदी राजीनामा द्या’, ‘अमित शहा राजीनामा द्या’, ‘ब्रुजभूषणसिंग यांना अटक झालीच पाहिजे’ अशा घोषणा देण्यात आल्या.

 

पुणेः महिला कुस्तीपटूंना दिल्ली पोलिसांकडून झालेल्या मारहाणीचा राष्ट्रवादीकडून निषेध
पुणेः महिला कुस्तीपटूंना दिल्ली पोलिसांकडून झालेल्या मारहाणीचा राष्ट्रवादीकडून निषेध

Mon, 29 May 202312:48 PM IST

पुण्यातील सांगवी, औंध, वाकड, बाणेरसह अनेक ठिकाणी जोरदार पाऊस व गारपीट

पुणे परिसरात सोमवार दुपारपासून जोरदार पाऊस व गारपीट सुरु आहे. सांघवी आणि वाकडमध्ये मोठ्या प्रमाणात गारपीट झाली. सांगवी औंध परिसरात जोरदार पावसासह गारपीट. बाणेर व बावधनमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस व गारपीट होत आहे.

Mon, 29 May 202312:11 PM IST

Nana Patole  : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी जनतेची जाहीर माफी मागावी; सावित्रीबाई, अहिल्यादेवींच्या अपमानाप्रकरणी काँग्रेसची मागणी

महाराष्ट्रात सदनात सावरकर जयंती साजरी करताना राजमाता अहिल्याबाई होळकर आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे पुतळे बाजूला करण्यात आले. समाजाच्या प्रेरणास्रोत असलेल्या या दोन महान व्यक्तींचा अपमान होणं ही संताप आणणारी घटना असून मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी जनतेची जाहीर माफी मागितली पाहिजे, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

Mon, 29 May 202311:54 AM IST

दिल्लीत तिहार जेलमध्ये कैद्यावर चाकूने हल्ला

दिल्लीतील तिहार जेलमध्ये कैद्याच्या दोन गटात हाणामारी झाल्याचे वृत्त आहे. सोमवारी दुपारी हा हल्ला झाला. यात कैद्यावर चाकूने हल्ला करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. जेल क्रमांक १ मध्ये आलोक नावाच्या कैद्याने राहुल नावाच्या कैद्यावर चाकूने हल्ला केला आहे. या हल्ल्यात दोघेही कैदी गंभीर जखमी झाले असून कैद्यांना दिनदयाळ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

Mon, 29 May 202310:42 AM IST

Eknath Shinde : मान्सूनच्या पूर्व तयारीसाठी मुख्यमंत्र्यांची बैठक, प्रशासनाला दिले महत्त्वपूर्ण आदेश

CM Eknath Shinde News : येत्या काही दिवसांत मान्सून महाराष्ट्रात दाखल होणार आहे. त्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली आहे. त्यात मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला बचावकार्य पथकं तयार करण्याचे आदेश जारी केले आहे. तसेच आपत्ती धोके व्यवस्थापनाचा खर्च प्रभावीपणे करण्याच्याही सूचना मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला केल्या आहे.

Mon, 29 May 202310:37 AM IST

P Chidambaram : मोदी सरकारच्या ९ वर्षांच्या कार्यकाळावर पी. चिदंबरम यांची सडकून टीका

केंद्रातील भाजप सरकार ९ वर्षात सर्व आघाड्यांवर पूर्णपणे अपयशी ठरलेलं आहे. धर्मनिरपेक्ष, लोकशाही देशामध्ये शासन आणि धोरणे सर्वसमावेशक असायला हवीत परंतु गेल्या नऊ वर्षांत एनडीए सरकारनं त्यासाठी काहीही केलेलं नाही आणि केंद्र सरकार आपल्या चुका सुधारून जनतेसाठी सुशासन करण्याचा प्रयत्नही करत नाही हे अत्यंत वाईट आहे, अशी टीका माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांनी केली.  दोन हजाराची नोट चलनात आणून परत घेण्याच्या निर्णयाचा भारतीय चलनाच्या स्थिरतेवर शंका करणारा आणि मूर्खपणाचा आहे, अशी हल्लाही त्यांनी चढवला. ते मुंबईतील टिळक भवनात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

Mon, 29 May 202310:22 AM IST

Closing bell : निर्देशांक वाढीसह बंद, महिंद्रा अँड महिद्रा स्टाॅक ठरला टाॅप गेनर

आठवड्याच्या पहिल्या ट्रेडिंग सेशनच्या दिवशी शेअर बाजार तेजीत बंद झाला. बीएसई सेन्सेक्स ३४४.६९ अंकांच्या वाढीसह ६२,८४६.३८ वर बंद झाला. दुसरीकडे,एनएसई निफ्टी ९१.६५ अंकांच्या वाढीसह १८,५९१.०० अंकांवर बंद झाला. निफ्टीत समाविष्ट असलेल्या महिंद्रा अँड महिंद्राच्या समभागांमध्ये सर्वाधिक वाढ दिसून आली. आज सोमवारी सुरुवातीच्या व्यवहारात शेअर बाजारात जोरदार तेजी पाहायला मिळाली. बीएसई सेन्सेक्स ४५५.८३ अंकांनी वाढून ६२,९५७.५२ वर उघडला. त्याच वेळी,एनएसई निफ्टी १३४.०५ अंकांच्या वाढीसह १८,६३३.४० अंकांवर पोहोचला होता. जागतिक बाजारातून मिळालेल्या चांगल्या संकेतांनंतर भारतीय बाजारात ही शानदार तेजी आली आहे. बाजारात तेजी आणण्यात बँकिंग स्टाॅक्सनी चांगली भूमिका बजावली.

Mon, 29 May 202310:15 AM IST

Bank of Maharashtra :  एनपीए व्यवस्थापनामध्ये बँक ऑफ महाराष्ट्र अव्वल 

मार्च 2023 मध्ये संपलेल्या आर्थिक वर्षाच्या दरम्यान आपले अनुत्पादक कर्ज खात्यांचे प्रमाण (नेट एनपीए ) ०.२५% पर्यंत मर्यादित ठेवून बँक ऑफ महाराष्ट्र ने अनुत्पादक कर्ज खात्यांच्या व्यवस्थापनामध्ये प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे.

सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीनुसार रुपये तीन लाख कोटी पेक्षा अधिक बँकिंग व्यवसाय असलेल्या बँकांमध्ये हे प्रमाण सर्वात कमी आहे. पुणे स्थित बँक ऑफ महाराष्ट्र नंतर खाजगी क्षेत्रातील एचडीएफसी बँकेने आपले निव्वळ अनुत्पादक कर्ज खात्यांचे प्रमाण 0.27% व कोटक महिंद्रा बँकेने तेच प्रमाण 0.37% पर्यंत मर्यादित ठेवून अनुत्पादक कर्ज खात्यांच्या व्यवस्थापनामध्ये अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक प्राप्त केला आहे.

Mon, 29 May 202310:10 AM IST

Mobil :  ह्रतिक रोशन मोबिलचा नवा ब्रँड अॅम्बेसिडर 

ल्युब्रिकेशन टेक्नॉलॉजी इनोव्हेशनमध्ये जागतिक स्तरावर आघाडीवर असलेल्या मोबिलटीएम ने आज बॉलीवूड सुपरस्टार हृतिक रोशनची नवीन ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून घोषणा केली.

Mon, 29 May 202308:53 AM IST

NCP : राष्ट्रवादी काँग्रेसकडून सावित्रीबाई फुले व अहिल्यादेवी होळकर यांच्या अपमानाचा निषेध, सरकार विरोधात आंदोलन

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या झालेल्या अपमानाचा निषेध म्हणून मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शिंदे सरकार विरोधात आंदोलन करण्यात आलं. विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंती निमित्त दिल्लीतील महाराष्ट्र सदनात कार्यक्रमाच्या वेळी तेथील सावित्रीबाई फुले व अहिल्यादेवी होळकर यांचे पुतळे हटवण्यात आले होते. त्यांचा राज्यभरात निषेध होत आहे.

Mon, 29 May 202308:43 AM IST

Eknath Shinde : प्रत्येक विभागीय आयुक्तालयाच्या ठिकाणी राज्य आपत्ती प्रतिसाद दल नेमा - एकनाथ शिंदे

विविध नैसर्गिक आपत्तींचे प्रमाण वाढत असून प्रत्येक विभागीय आयुक्तालयाच्या ठिकाणी राज्य आपत्ती प्रतिसाद दल नेमावे तसेच पालिकांनी देखील त्यांच्या स्तरावर आपत्तीत तत्काळ बचाव कार्य करणारी पथके तयार करावीत, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिल्या. राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीत ते बोलत होते. राज्य आपत्ती धोके व्यवस्थापनासाठीचा निधी व्यवस्थित खर्च करा, असंही शिंदे यांनी सांगितलं.

Mon, 29 May 202308:08 AM IST

Sanjay Raut: पुणे लोकसभा पोटनिवडणूकीसंदर्भात संजय राऊत मोठे वक्तव्य

पुणे लोकसभा पोटनिवडणूकीसंदर्भात संजय राऊतांनी एक ट्विट केले आहे. ज्यात त्यांनी म्हटले आहे की, "संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी प्रत्येकाला थोडा त्याग करावा लागेल. पुण्याच्या लोकसभेच्या जागेबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा होईल."

Mon, 29 May 202307:13 AM IST

Pune Fire : पुण्यातील कल्याणीनगर आयटी पार्कच्या पाचव्या मजल्यावर आग, इमारतीत अडकलेल्या कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु

punefire : कल्याणीनगर येथील मारीगोल्ड आयटी पार्क येथे आगीची घटना; अग्निशमन दलाकडून उंच शिडीची ब्रॉन्टो व इतर चार अग्निशमन वाहने दाखल. इमारतीत गच्चीवर अडकलेल्या 4 नागरिकांची सुटका तर अजून काही नागरिक अडकल्याची शक्यता.

Mon, 29 May 202306:48 AM IST

Guwahati Accident: गुवाहाटीमध्ये रस्ते अपघातात सात ठार, अनेक जखमी

आसाममधील गुवाहाटी येथील जलुकबारी भागात रविवारी रात्री भीषण अपघात झाला. या अपघातात सात जणांचा मृत्यू झाला आहे. मोठ्या संख्येत लोक जखमी झाले आहेत.

Mon, 29 May 202304:54 AM IST

Bhandara Rains: भंडारा जिल्ह्यात अवकाळी पाऊस, पिकांचे नुकसान

भंडारा जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून अवकाळी पाऊस पडत आहे. यामुळे शेतकरीवर्ग पुरता हतबल झाला असून शेतातील पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

Mon, 29 May 202304:43 AM IST

Opening bell : आठवड्याची दमदार सुरुवात, सेन्सेक्सने गाठली ६३ हजारांची अंशपातळी

आठवड्याच्या पहिल्या दिवशी देशांतर्गत शेअर बाजारात जोरदार वाढीसह सुरू झाला. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स ५०० अंकांच्या वाढीसह ६३००० ची अंशपातळी गाठली आहे. दुसरीकडे, निफ्टीतही १२२ अंशांच्या वाढीसह १८६०० अंशांची पातळी ओलांडली. या काळात रुपया ७ पैशांनी वधारुन ८२.५३ रुपयांच्या पातळीवर व्यवहार करताना दिसत आहे. सध्या सेन्सेक्स ४११.७५ (०.६६%) अंकांच्या वाढीसह ६२,९१३.४४ अंश पातळीवर ट्रेड करत आहे. दुसरीकडे, निफ्टी १२० अंशांच्या वाढीसह (०.६५%) १८,६१९.३५ अंशांच्या पातळीवर पोहोचला आहे.बँक निफ्टी सर्वकालीन उच्चांकावर पोहोचला आहे.

Mon, 29 May 202303:07 AM IST

Gujarat Fire: गुजरातमधील प्लास्टिकच्या गोदामाला आग

 

Gujarat Fire: गुजरातच्या खेडा जिल्ह्यातील गोबलेज गावात एका प्लास्टिक कारखान्याला भीषण आग लागली. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या ८ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

Mon, 29 May 202302:57 AM IST

Ajit Pawar: विरोधी पक्षनेते अजित पवार बारामती दौऱ्यावर

राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज पहाटे सहा वाजल्यापासून विकासकामांची पाहणी केली.

Mon, 29 May 202302:55 AM IST

Pune Fire: पुण्यातील मार्केटयार्डमधील पुठ्ठ्याच्या गोदामाला आग

पुण्यातील मार्केटयार्डमधील पुठ्ठ्याच्या गोदामाला मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास आग लागली. या आगीचे माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. आग आटोक्यात आली असून आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. या आगीत कोणताही जीवितहानी झाली नाही.

Mon, 29 May 202301:21 AM IST

Wrestling Protest: आंदोलनातील ‘या’ खेळाडूंविरोधात गुन्हा दाखल

 

Wrestling Protest: दिल्ली पोलिसांनी कुस्तीपटू साक्षी मलिक, विनेश फोगट आणि बजरंग पुनिया तसेच निषेध करणाऱ्या आंदोलनकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सर्वांविरुद्ध १४७, १४९, १८६, १८८, ३३२, ३५३, पीडीपीपी कायद्याच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.