मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रियकराशी सेक्स, अतिरक्तस्रावाने प्रेयसीचा मृत्यू; तरुण अटकेत
girlfriend dies during sexual intercourse
girlfriend dies during sexual intercourse

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रियकराशी सेक्स, अतिरक्तस्रावाने प्रेयसीचा मृत्यू; तरुण अटकेत

28 March 2023, 9:44 ISTNinad Vijayrao Deshmukh

girlfriend dies during sexual intercourse : बंगरुळ येथे एक धक्कादायक घटना पुढे आली आहे. अल्पवयीन प्रेयसीशी शारीरिक संबंध ठेवल्याने तिचा अतिरक्तस्त्रावाने मृत्यू झाला.

बंगळुरु : बंगळूर येथून एक धक्कादायक बातमी पुढे येत आहे. एका अल्पवयीन प्रेयसीला एका निर्जन ठिकाणी नेत प्रियकराने तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. या दरम्यान, गुप्तांगातून अतिरक्तस्त्राव झाल्याने प्रेयसीचा मृत्यू झाला. बंगळूर जवळील रामनगर जिल्ह्यात ही घटना घडली.

ट्रेंडिंग न्यूज

मृत प्रेयसी ही १७ वर्षीयअसून तिचा प्रियकर हा १८ वर्षाच्या आहे. दोघेही कागलीपुरा येथील जवळच्या गावात राहणारे आहेत. हे दोघे एकाच शाळेत असल्याने त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले होते. आरोपी हा रोजंदारीवर काम करतो. त्याला पोलिसानी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हे दोघेही एका निर्जन स्थळी गेले होते. या ठिकाणी आरोपीने मुलीसोबत शारीरिक संबंध घेवले. दरम्यान, संभोग करत असताना पीडितेच्या गुप्तांगातून अतिरिक्त प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने तिचा मृत्यू झाला. ही घटना घटना कळताच पोलिसांनी घटनास्थळी जात मुलीचा मृतदेह ताब्यात घेतला आहे. तिचा मृतदेह शवविच्छेदणासाठी पाठवण्यात आला आहे.

दरम्यान, पीडित मुलीचे वडील म्हणाले, मुलीला आरोपीशी दूर राहण्याची ताकीद आम्ही दिली होती. तिने त्याच्याशी संबंध तोडले होते. मात्र, त्याने पुन्हा मुलीशी जवळीक वाढवली होती. शुक्रवारी संध्याकाळी त्याने मला फोन केला. श्वास घेण्यास त्रास होत असल्याने ती बेशुद्ध पडल्याचं त्याने सांगितलं. त्याने तिला पाणी दिलं, मात्र प्रयत्न व्यर्थ ठरले. आम्ही तिला घेऊन तीन खासगी रुग्णालयांत फिरलो. मात्र, दरम्यान, माझ्या मुलीचा मृत्यू झाला. या घटनेला सर्वस्वी तरुणच जबाबदार असल्याचे देखील तिचे वडील म्हणाले. मृतदेह शवविच्छेदनासाठी बंगळुरु-म्हैसूर रस्त्यावरील रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. पोस्टमॉर्टमचा अहवाल आल्यावर मृत्यूचे खरे कारण कळणार आहे.

 

विभाग