रमजानसाठी मक्का येथे जाणाऱ्या प्रवासी गाडीला आग; २० भविकांचा होरपळून मृत्यू; २९ जन गंभीर जखमी
bus fire in Saudi arabia : सध्या पवित्र रमजान महिना सुरू आहे. या महिन्यात मक्का येथे दर्शनासाठी जात असलेल्या एका भाविकांच्या बसला अचानक आग लागल्याने झालेल्या दुर्घटनेत तब्बल २० भविकांचा होरपळून मृत्यू झाला. तर २९ भाविक हे भाजल्याने जखमी झाले आहेत.
सध्या पवित्र रमजान महिना सुरू आहे. जगभरातून मुस्लिम भाविक हे मक्का येथे येत आहेत. असेच काही भाविक मक्का येथे एका बसमधून दर्शनासाठी जात असताना एका पुलावर ही बस धडकल्यावर लागलेल्या भीषण आगीत तब्बल २० भविकांचा जाळून मृत्यू झाला. तर २९ नागरिक भाजून जखमी झाले. ही घटना सौदी अरेबियाच्या दक्षिण भागातील असीर प्रांतात घडली. ही बस सर्व भाविकांना मक्का आणि मदिण येथे घेऊन जात होती. या घटनेचा एक व्हिडिओ देखील पुढे आला असून या अपघाताची भीषणता यातून दिसत आहे. संपूर्ण बस आगीच्या विळख्यात सापडली असल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे.
ट्रेंडिंग न्यूज
रमजान महिना सुरू झाला आहे. या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मक्का आणि मदिना येथे जाण्यासाठी हज यात्रेला जाण्याच्या उत्साह आहे. या महिन्यात जगभरातून लाखो भाविक या ठिकाणी येत असतात. सौदी अरेबियाच्या सरकारी वाहिनी अल एखबरियाने दिलेल्या वृत्तानुसार या अपघातात २० नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर २९ नागरिक जखमी झाले आहेत. माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार या घेतनेत विविध देशातून नागरिक ठार झाले आहेत. मृत व्यक्ति नेमके कुठले होते, या बाबत अधिकृत माहिती मिळू शकली नाही.
बसमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे ही घटना असल्याचे काही माध्यमांचे म्हणणे आहे. तर बसचे ब्रेक फेल झाल्याने ही दुर्घटना झाल्याने ही बस एका पूलाला जाऊन धडकली. यामुळे बसमध्ये आग लागली आणि यात २० प्रवाशांचा मृत्यू झाला असे काही माध्यमांचे म्हणणे आहे.