मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Naba Kishordas : पीएसआयच्या गोळीबारात जखमी झालेल्या आरोग्यमंत्र्यांचं निधन; ओडिशात शोककळा

Naba Kishordas : पीएसआयच्या गोळीबारात जखमी झालेल्या आरोग्यमंत्र्यांचं निधन; ओडिशात शोककळा

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Jan 29, 2023 08:28 PM IST

Jharsuguda Firing : झारसुगुडा जिल्ह्यातील एका कार्यक्रमात जात असताना पोलीस निरिक्षकानं आरोग्यमंत्र्यावर गोळीबार केला होता.

Health Minister Naba Kishoredas Dies In Jharsuguda Odisha
Health Minister Naba Kishoredas Dies In Jharsuguda Odisha (HT)

Health Minister Naba Kishoredas Dies In Jharsuguda Odisha : पोलीस निरिक्षकानं केलेल्या गोळीबारात गंभीर जखमी झालेले ओडिशाचे आरोग्यमंत्री नाबा किशोरदास यांचं निधन झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ओडिशातील झारसुगुडा जिल्ह्यात आरोपी पोलीस निरिक्षकानं आरोग्यमंत्री नाबा किशोरदास यांच्यावर तुफान गोळीबार केला होता. त्यानंतर त्यांना भूवनेश्वरमधील एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. परंतु परंतु डॉक्टरांच्या टीमला त्यांचं प्राण वाचवण्यात अपयश आलं आहे. त्यामुळं आता नववर्षाचा पहिला महिना संपत असतानाच ओडिशात शोककळा पसरली आहे. मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांच्यासह बिजू जनता दलाच्या अनेक नेत्यांनी या घटनेबद्दल दुख: व्यक्त करत आरोग्यमंत्री नाबा किशोरदास यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

ओडिशातील झारसुगुडा जिल्ह्यातल्या बृजराजनगरमध्ये एका कार्यक्रमासाठी आरोग्यमंत्री नाबा किशोरदास आले होते. त्यावेळी कारमधून उतरताच पोलीस निरिक्षकानं त्यांच्यावर गोळीबार केला होता. आरोपी पोलीस निरिक्षकानं आरोग्यमंत्री नाबा किशोरदास यांच्यावर पाच गोळ्या झाडल्या त्यातील चार गोळ्या त्यांच्या छातीत लागल्या होत्या. त्यानंतर उपस्थितांनी त्यांना उपचारासाठी तातडीनं भूवनेश्वरमधील रुग्णालयात दाखल केलं होतं. परंतु आता त्यांचं निधन झालं आहे. झारसुगुडातील या गोळीबाराच्या चौकशीचे आदेश जिल्हा प्रशासनानं दिले आहेत. आरोपी पोलीस कर्मचाऱ्यानं आरोग्यमंत्र्यांवर गोळीबार का केला?, याचं कारण अद्याप समोर आलेलं नाही.

ज्यावेळी आरोपीनं नाबा किशोरदास यांच्यावर गोळीबार केला, त्यावेळी पाचपैकी चार गोळ्या त्यांच्या छातीत लागल्या होत्या. परंतु त्यांच्यावर तातडीनं उपचार सुरू करण्यात आल्यामुळं त्यांना वाचवण्याचे प्रयत्न डॉक्टरांनी सुरू केले होते. परंतु घटनास्थळी आणि रुग्णालयात नेताना नाबा किशोरदास यांच्या शरीरातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्यामुळं त्यांचं निधन झालं आहे. त्यामुळं आता आरोपी पोलीस निरिक्षकाला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली जात आहे.

IPL_Entry_Point