Bharat Jodo Yatra : भाजपच्या धार्मिक विद्वेषाच्या राजकारणाविरोधात निघालेली काँग्रेसची भारत जोडो यात्रा श्रीनगरमध्ये पोहचली आहे. यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ऐतिहासिक लाल चौकात तिरंगा फडकावला आहे.
(PTI)Bharat Jodo Yatra In Lal Chowk : लाल चौकात राष्ट्रध्वजाचं ध्वजारोहण करण्यात आल्यानंतर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार सेलिब्रेशन केलं. परंतु कार्यक्रमावेळी चौकात राष्ट्रध्वजाच्या उंचीपेक्षा राहुल गांधींच्या कटाऊटची उंची जास्त असल्याचा आरोप सोशल मीडियावर करण्यात येत आहे.
(Imran Nissar)Bharat Jodo Yatra In Srinagar : त्यामुळं आता राहुल गांधी यांनी राष्ट्रध्वजाचा अपमान केल्याचा आरोप करत त्यांना सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात येत आहे.
(Imran Nissar)Bharat Jodo Yatra In Jammu Kashmir : ध्वजारोहण करणं चांगली गोष्ट आहे पण राहुल गांधी यांचं फ्लेक्स राष्ट्रध्वजापेक्षा मोठं का आहे?, असा सवाल अनेकांनी सोशल मीडियावर विचारला आहे.
(Imran Nissar)