मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  PHOTOS : अंधश्रद्धा, धर्मांतरण ते संत तुकाराम; हिरेंद्र शास्त्रींच्या या वक्तव्यांमुळं पेटलं वादंग!

PHOTOS : अंधश्रद्धा, धर्मांतरण ते संत तुकाराम; हिरेंद्र शास्त्रींच्या या वक्तव्यांमुळं पेटलं वादंग!

Jan 29, 2023 06:59 PM IST Atik Sikandar Shaikh
  • twitter
  • twitter

  • Bageshwar Dham Hirendra Shastri : हिरेंद्र शास्त्रींनी वादग्रस्त वक्तव्य करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. यावेळी मात्र त्यांनी संत तुकाराम महाजारांबाबत मुक्ताफळं उधळल्यानं वादंग पेटलं आहे.

Bageshwar Dham Hirendra Shastri Controversial Statement : बागेश्वर धामचे हिरेंद्र शास्त्री गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आले आहे. नागपुरातील एका कार्यक्रमात त्यांनी दिव्यशक्तीचा दावा केला होता. त्यानंतर अंनिसचे श्याम मानव यांनी चमत्कार करून दाखवण्याचं ओपन चॅलेंज त्यांना दिलं. त्यानंतर श्याम मानव यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती.
twitterfacebookfacebook
share

(1 / 5)

Bageshwar Dham Hirendra Shastri Controversial Statement : बागेश्वर धामचे हिरेंद्र शास्त्री गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आले आहे. नागपुरातील एका कार्यक्रमात त्यांनी दिव्यशक्तीचा दावा केला होता. त्यानंतर अंनिसचे श्याम मानव यांनी चमत्कार करून दाखवण्याचं ओपन चॅलेंज त्यांना दिलं. त्यानंतर श्याम मानव यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती.(HT)

धिरेंद्र शास्त्री हे सनातन धर्माचे धर्मगुरू मानले जातात. त्यांच्यावर अंधश्रद्धा पसरवण्याचा आरोप करण्यात आलेला आहे. याशिवाय शेवटच्या श्वासापर्यंत धर्मांतर करत राहणार असल्याचं वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केलं होतं. त्यामुळं अनेक लोकांनी त्यांच्यावर टीका केली होती.
twitterfacebookfacebook
share

(2 / 5)

धिरेंद्र शास्त्री हे सनातन धर्माचे धर्मगुरू मानले जातात. त्यांच्यावर अंधश्रद्धा पसरवण्याचा आरोप करण्यात आलेला आहे. याशिवाय शेवटच्या श्वासापर्यंत धर्मांतर करत राहणार असल्याचं वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केलं होतं. त्यामुळं अनेक लोकांनी त्यांच्यावर टीका केली होती.(HT)

बागेश्वर धाममधील ३३ लाखांचं पार्किंटचं टेंडर धिरेंद्र शास्त्री यांच्या नातेवाईकांना केवळ १५ हजार रुपयांत देण्यात आलं होतं. त्यामुळं वशिलेबाजी करून नातेवाईकांना फायदा पोहचवल्याचा आरोप धिरेंद्र शास्त्रींवर करण्यात आला होता.
twitterfacebookfacebook
share

(3 / 5)

बागेश्वर धाममधील ३३ लाखांचं पार्किंटचं टेंडर धिरेंद्र शास्त्री यांच्या नातेवाईकांना केवळ १५ हजार रुपयांत देण्यात आलं होतं. त्यामुळं वशिलेबाजी करून नातेवाईकांना फायदा पोहचवल्याचा आरोप धिरेंद्र शास्त्रींवर करण्यात आला होता.(HT)

एका कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना धिरेंद्र शास्त्रींनी देशातील विरोधी नेत्यांना अतिरेकी म्हटलं होतं. मला कुणाचाही भीती नाही, वक्तव्यावर कायम असल्याचं त्यांनी ठामपणे सांगितलं होतं. त्यामुळं त्यांना टीकेचा सामना करावा लागला होता.
twitterfacebookfacebook
share

(4 / 5)

एका कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना धिरेंद्र शास्त्रींनी देशातील विरोधी नेत्यांना अतिरेकी म्हटलं होतं. मला कुणाचाही भीती नाही, वक्तव्यावर कायम असल्याचं त्यांनी ठामपणे सांगितलं होतं. त्यामुळं त्यांना टीकेचा सामना करावा लागला होता.(HT)

आता हिरेंद्र शास्त्रींनी संत तुकाराम महाराजांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. एका कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले की, संत तुकाराम महाराजांना त्यांची पत्नी रोज काठीनं मारत होती. रोज बायकोचा मार खाता, लाज नाही का वाटत?, असा प्रश्न एकानं केल्यानंतर संत तुकाराम म्हणाले की, मला मारहाण करणारी बायको मिळणं ही देवाचीच कृपा आहे. मारहाण करणारी बायको मिळाल्यामुळं मला देवाची सेवा करण्याची संधी मिळते, असं तुकारामांनी म्हटल्याचा दावा धिरेंद्र शास्त्री यांनी केला आहे. त्यामुळं त्यांच्या या नव्या वादग्रस्त वक्तव्यामुळं राजकीय वादंग पेटलं आहे.
twitterfacebookfacebook
share

(5 / 5)

आता हिरेंद्र शास्त्रींनी संत तुकाराम महाराजांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. एका कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले की, संत तुकाराम महाराजांना त्यांची पत्नी रोज काठीनं मारत होती. रोज बायकोचा मार खाता, लाज नाही का वाटत?, असा प्रश्न एकानं केल्यानंतर संत तुकाराम म्हणाले की, मला मारहाण करणारी बायको मिळणं ही देवाचीच कृपा आहे. मारहाण करणारी बायको मिळाल्यामुळं मला देवाची सेवा करण्याची संधी मिळते, असं तुकारामांनी म्हटल्याचा दावा धिरेंद्र शास्त्री यांनी केला आहे. त्यामुळं त्यांच्या या नव्या वादग्रस्त वक्तव्यामुळं राजकीय वादंग पेटलं आहे.(HT)

IPL_Entry_Point

इतर गॅलरीज