मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  भाषण करताना अर्थमंत्र्यांची जीभ घसरली, गडकरींसह विरोधकांना हसू आवरेना; नेमकं काय घडलं?
Union Finance Minister Nirmala Sitharaman presents the Union Budget 2023-24 in the Lok Sabha, in New Delhi, Wednesday, Feb. 1, 2023.
Union Finance Minister Nirmala Sitharaman presents the Union Budget 2023-24 in the Lok Sabha, in New Delhi, Wednesday, Feb. 1, 2023. (PTI)

भाषण करताना अर्थमंत्र्यांची जीभ घसरली, गडकरींसह विरोधकांना हसू आवरेना; नेमकं काय घडलं?

01 February 2023, 13:28 ISTAtik Sikandar Shaikh

Union Budget 2023 : एका शब्दाचा अर्थ बदलला तर त्या अर्थाचा अनर्थ कसा होतो, याचा प्रत्यय केंद्रीय अर्थमंत्री निर्माल सीतारमन यांच्यासहित सर्व खासदारांनी आला आहे.

Finance Minister Nirmala Sitharaman : केंद्रातील मोदी सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज लोकसभेत सादर केला आहे. यावेळी त्यांनी रेल्वे, एमएसएमई सेक्टरसह देशातील अनेक समाजघटकांसाठी मोठ्या घोषणा केल्या आहेत. परंतु बजेट सादर करत असताना अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांची अचानक जीभ घसरली अन् सभागृहात एकच हशा पिकला. परंतु चूक झाल्याचं लक्षात येताच अर्थमंत्र्यांनी तातडीनं माफी मागत प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. परंतु बजेट सादर करत असताना अर्थमंत्र्यांच्या एका शब्दाचा मोठा अर्थ झाल्यामुळं सत्ताधारी आणि विरोधकांना हसू आवरेनासं झालं. त्यामुळं सभागृहात नेमकं काय झालं हे जाणून घेऊयात.

ट्रेंडिंग न्यूज

लोकसभेत अर्थसंकल्प सादर करताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी वाहतूक आणि वाहनांच्या धोरणावरील योजनांची घोषणा करायला सुरुवात केली. त्यावेळी बोलताना त्यांना जून्या प्रदूषित वाहनांचा उल्लेख 'ओल्ड पॉल्युटेड व्हेहिकल' असा करायचा होता. परंतु बोलण्याच्या ओघात त्या 'ओल्ड पॉलिटिकल व्हेहिकल' असं बोलून गेल्या. त्यामुळं केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्यासह सत्ताधारी खासदार आणि विरोधी पक्षाचे खासदार जोरजोरात हसायला लागले. त्यामुळं भाषणात काही तरी चुकल्याचं लक्षात येताच अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी सॉरी म्हणत सभागृहाची माफी मागितली.

अनपेक्षितपणे केलेल्या वक्तव्यावर बोलताना अर्थमंत्री निर्मला सीतारमन म्हणाल्या की, सॉरी, सभागृहातील सर्वांनी माझी चूक लक्षात आणून दिल्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते. परंतु आता जून्या प्रदूषित वाहनांना भंगारात काढण्यासाठी केंद्र सरकारकडून आर्थिक मदत केली जाणार आहे. प्रदूषण न करणारी वाहनं रस्त्यावर आणण्याचा सरकारचा मानस असून ते अर्थव्यवस्थेसाठीही अत्यंत महत्त्वपूर्ण आहे, असं स्पष्टीकरण दिल्यानंतर सभागृहातील वादावर पडदा पडला.