Dimple Yadav On Encounters In Uttar Pradesh : प्रयागराज येथील कुख्यात गुंड अतिक अहमद याचा मुलगा असद आणि त्याचा साथीदार गुलाम यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी एन्काउंटरमध्ये ठार केलं आहे. त्यानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पोलीस खात्याचं कौतुक करत राज्यात गुंडगिरी सहन केली जाणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. परंतु आता उत्तर प्रदेशात सातत्याने फेक एन्काउंटर केले जात असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या पत्नी आणि समाजवादी पक्षाच्या नेत्या डिंपल यादव यांनी केला आहे. त्यामुळं आता यावरून भाजपा आणि सपामध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडण्याची शक्यता आहे.
कुख्यात गुंड अतिक अहमदला प्रयागराज येतील न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर उमेश पाल हत्याकांडातील प्रमुख आरोपी असद अहमद आणि त्याचा साथीदार गुलाम यांना पोलिसांनी एन्काउंटरमध्ये ठार केलं होतं. त्यानंतर अनेकांनी पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत एन्काउंटरची चौकशी करण्याची मागणी केली आहे. सपा नेत्या डिंपल यादव हाच मुद्दा उचलत म्हणाल्या, उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री झाल्यापासून सातत्याने फेक एन्काउंटर्स केले जात आहेत. असद आणि गुलाच्या एन्काउंटरमुळं ही बाब स्पष्ट होत आहे. आम्ही सुरुवातीपासूनच फेक एन्काउंटरच्या विरोधात भूमिका घेतलेली असल्याचं सांगत डिंपल यादव यांनी योगी सरकारवर फेक एन्काउंटर करत असल्याचा गंभीर आरोप केला आहे.
भाजपच्या शासनकाळात एन्काउंटर्सच्या घटना वाढल्या...
उत्तर प्रदेशमध्ये २०१७ साली भाजपचं सरकार आलं होतं. योगी आदित्यनाथ राज्याचे मुख्यमंत्री झाल्यानंतर २०१७ ते २०२३ या काळात १०७०० एन्काउंटर्स करण्यात आलेले आहेत. त्यामुळं आता मोठ्या संख्येने एन्काउंटर्स होत असल्यामुळं यूपी पोलिसांच्या कार्यक्षमतेवर आणि कारवाईवर अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. त्यातच आता मुख्य विरोधी पक्ष असलेल्या समाजवादी पार्टीने असद आणि गुलामला फेक एन्काउंटरमध्ये ठार मारण्यात आल्याचा आरोप केल्यानंतर एन्काउंटर्सची चौकशी करण्याची मागणी केली जात आहे.
संबंधित बातम्या