मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  माजी लष्करप्रमुखांसह निवृत्त अधिकारी भारत जोडो यात्रेत; कडाक्याच्या थंडीत राहुल गांधींसोबत पदयात्रा
Bharat Jodo Yatra In Haryana Live Updates
Bharat Jodo Yatra In Haryana Live Updates (HT)

माजी लष्करप्रमुखांसह निवृत्त अधिकारी भारत जोडो यात्रेत; कडाक्याच्या थंडीत राहुल गांधींसोबत पदयात्रा

09 January 2023, 9:39 ISTAtik Sikandar Shaikh

Bharat Jodo Yatra : दिल्ली आणि उत्तर प्रदेशचा प्रवास करत काँग्रेसची भारत जोडो यात्रा हरयाणामध्ये दाखल झाली आहे. त्यावेळी अनेक निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांनी पदयात्रेत सहभाग घेतला.

Bharat Jodo Yatra In Haryana Live Updates : दक्षिणेसह मध्य भारतातील अनेक राज्यांचा प्रवास करत काँग्रेसची भारत जोडो यात्रा हरयाणात पोहचली आहे. गेल्या काही दिवसांपासून उत्तर भारतात कडाक्याची थंडी पडत असतानाही राहुल गांधींनी पदयात्रा सुरुच ठेवली असून थंडीतही लोकांशी संवाद साधत असल्याचे त्यांचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. भारत जोडो यात्रा दिल्लीत दाखल झाल्यानंतर दाक्षिणात्य अभिनेते कमल हासन यांनी भारत जोडो यात्रेत सहभागी होत काँग्रेसला पाठिंबा जाहीर केला होता. त्यानंतर आता पदयात्रा हरयाणा आणि पंजाबच्या दिशेनं रवाना होत असतानाच आता अनेक निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांनी काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत सहभाग घेतला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

काँग्रेसची भारत जोडो यात्रा हरयाणात दाखल झाल्यानंतर कुरुक्षेत्रमध्ये निवृत्त लष्करप्रमुख दीपक कपूर हे भारत जोडो यात्रेत सहभागी झाले. त्यांनी भल्या सकाळी राहुल गांधी यांच्यासोबत पदयात्रा करत देशातील सामाजिक आणि राजकीय स्थितीवर चर्चा केली आहे. यावेळी दीपक कपूर यांच्यासोबत अनेक निवृत्त लष्करी अधिकारी आणि निवृत्त जवानही भारत जोडो यात्रेत सहभागी झाले. त्यामुळं आता काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेला कला, साहित्यासह लष्करी क्षेत्रातूनही पाठिंबा मिळाल्यानं केंद्रातील मोदी सरकारच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

कडाक्याच्या थंडीतही यात्रा सुरुच...

उत्तर भारतात गेल्या पंधरा दिवसांपासून कडाक्याच्या थंडीमुळं लोक हैराण झाले आहेत. घराबाहेर पडताना लोकांना उबदार कपड्यांचा वापर करावा लागत असताना राहुल गांधी मात्र केवळ एका टी-शर्टवर यात्रा करत आहे. त्यामुळं राहुल गांधींना थंडी लागत नाही का?, असा सवाल सोशल मीडियावर उपस्थित केला जात आहे. हरयाणानंतर भारत जोडो यात्रा पंजाबमार्गे जम्मू-काश्मिरमध्ये दाखल होणार असून त्यासाठीही काँग्रेस पक्षानं जोरदार तयारी सुरू केली आहे.