मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Weather Update : उत्तर भारतात थंडीची लाट ! प्राण्यासाठी शेकोट्या अन् ब्लँकेट; राज्यातही पारा घसरला

Weather Update : उत्तर भारतात थंडीची लाट ! प्राण्यासाठी शेकोट्या अन् ब्लँकेट; राज्यातही पारा घसरला

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Jan 09, 2023 08:53 AM IST

Weather Update News : उत्तर भारतात मोठ्या प्रमाणात थंडीची लाट आली आहे. तब्बल पाच राज्यात पुन्हा तापमान कमी होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.

Weather Update
Weather Update

Weather Update News : देशात थंडीची लाट आली आहे. उत्तर भरातात अनेक जिल्हे हे थंडीने गारठले आहेत. नागरिक शेकोट्या पेटवून थंडीपासून बचाव करत आहेत. त्यात प्राणिसंग्रहालयातील प्राण्यांना देखील थंडीचा फटका बसत असून त्यांच्यासाठी खास हिटर आणि ब्लँकेटची देखील व्यवस्था करण्यात आली आहे. राज्यात देखील थंडीची लाट आली आहे. अनेक जिल्ह्यात पारा घसरला आहे. विदर्भात मोठ्या प्रमाणात थंडी वाढली असून याचा परिणाम पिकांवर होत आहे.

देशातील वातावरणात बदल असून कुठे थंडीचा कडाका तर ढगाळ वातावरण देखील आहे. उत्तर भरातात मोठ्या प्रमाणात धुके देखील पडल्याने याचा परिणाम सार्वजनिक वाहतुकीवर देखील झाला आहे. राज्यात पुन्हा थंडीचा कडाका वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, उत्तर प्रदेश या राज्यांत येत्या काळात थंडी वाढणार आहे. पारा हा १० ते १२ अंश सेल्सिअसच्या एवढा आहे. यात आणखी घट होण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार सफदरगंजमध्ये सर्वात कमी १.९ डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तर राजस्थान, बिहारमध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार पुढील दोन दिवसात उत्तर मध्य महाराष्ट्राचा काही भाग, सलंग्न मराठवाडा भाग तसेच विदर्भात तापमानात घट झाली आहे. पुणे, अहमदनगर, औरंगाबाद, जळगाव काही भागातही थंडी वाढण्याची शक्यता आहे.

विदर्भात काही भागांत थंडीच्या लाटेची स्थिती निर्माण होऊन गोंदियामध्ये राज्यातील नीचांकी ६.८ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. मराठवाड्यातील तापमानाचा पाराही घटला असून, थंडीत वाढ झाली आहे. उर्वरित महाराष्ट्रात दोन दिवसांत तापमानात घट होऊन थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता आहे. नागपूर येथे ८.०, ब्रह्मपुरी येथे ९.६, तर वर्धा येथे ९.४ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदविले गेले. अकोला, अमरावती, बुलढाणा यवतमाळ आदी जिल्ह्यांतही १० ते ११ अंशांवर तापमान आले आहे. मराठवाड्यात औरंगाबाद येथे ९.४, तर उस्मानाबादमध्ये १०.१ अंश किमान तापमानाची नोंद झाली.

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या

विभाग