मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  उड्डाण करताच विमानाला चिमणी धडकली; पायलटच्या सावधानतेमुळं अनर्थ टळला, दिल्ली विमानतळावर अलर्ट
Dubai Plan Accident In Delhi Airport
Dubai Plan Accident In Delhi Airport (HT)

उड्डाण करताच विमानाला चिमणी धडकली; पायलटच्या सावधानतेमुळं अनर्थ टळला, दिल्ली विमानतळावर अलर्ट

01 April 2023, 16:10 ISTAtik Sikandar Shaikh

Plan Accident In Delhi Airport : विमानाचं एमर्जेन्सी लँडिंग करण्यात आल्यानंतर रुग्णवाहिका आणि अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

Dubai Plan Accident In Delhi Airport : दिल्ली विमानतळाहून दुबईसाठी उड्डाण केलेल्या विमानाला चिमणीनं धडक दिल्याची थरारक घटना समोर आली आहे. त्यानंतर पायलटने प्रसंगावधान राखत विमानाचं एमर्जेन्सी लँडिंग केल्यामुळं मोठा अपघात टळला असून त्यानंतर दिल्ली विमानतळावर अलर्ट जारी करण्यात आला आहे. याशिवाय विमानाचं लँडिंग करण्यात आल्यानंतर रुग्णवाहिकांसह अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहे. या घटनेत कुणालाही इजा झाल्याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. दुपारी एक वाजेच्या सुमारास दिल्ली विमानतळावर थरारक घटना घडलेल्यामुळं प्रवाशांचा जीव भांड्यात पडला होता.

ट्रेंडिंग न्यूज

मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली विमानतळाहून फेडएक्स एअरक्राफ्ट कंपनीचं विमान दुबईसाठी निघालं होतं. विमानानं उड्डाण करताच त्याला एका चिमणीनं घडक दिली. त्यानंतर अपघात होऊ नये, यासाठी पायलटने तातडीनं विमानाचं एमर्जेन्सी लँडिंग केलं. त्यामुळं मोठा अनर्थ टळला आहे. त्यानंतर दिल्ली विमानतळावर अलर्ट जारी करण्यात आला असून त्यामुळं अनेक विमानांचं वेळापत्रक कोलमडलं आहे. याशिवाय विमान प्रवासाला निघालेल्या अनेक प्रवाशांचा जीव या घटनेमुळं भांड्यात पडला होता. त्यानंतर आता दिल्ली विमानतळ प्रशासनाकडून आपात्कालीन स्थितीचा आढावा घेतला जात आहे.

विमानानं उड्डाण करताच पक्ष्यांनी धडक दिल्यामुळं अनेक विमानांना अपघात झाल्याच्या घटना समोर आलेल्या आहेत. त्यामुळं आता या थरारक घटनेमुळं दिल्ली विमानतळावर खळबळ उडाली असून स्थिती नियंत्रणात आणली जात आहे. याशिवाय दिल्ली विमानतळावरील विमानसेवा सुरळीत करण्याचंही काम जारी आहे.