Air India : गेल्या वर्षी जानेवारीत सरकारकडून एअर इंडियाचे नियंत्रण आपल्या हातात घेतल्यानंतर टाटा समूह एअऱ इंडियाच्या पूर्नरचनेच्या पाठी लागले आहेत.
टाटा समुहाची मालकी हक्क असलेली एअर इंडिया कंपनीने भारतीय प्रतिस्पर्धी आयोग (सीसीआय) द्वारे विस्तारासह विलीनीकरणाला मंजूरी मिळेपर्यंत ग्राऊंड स्टाफसाठी कोणत्याही प्रकारची पगारवाढ रोखण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एअर इंडियाचे सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक कॅपबेल विल्सन यांनी कर्मचाऱ्यांना एका ईमेलद्वारे ही माहिती दिली आहे.
विलीनीकरणानंतर वाढणार पगारवाढ
एअर इंडियाचे सीईओ कॅपबेल विल्सन यांनी सांगितले की, विस्ताराच्या विलीनीकरणानंतर एअर इंडियाच्या ग्राऊंड स्टाफला पगारवाढ दिली जाईल. एअर इंडियामध्ये विस्ताराचे विलीनीकरण झाल्यानंतर विस्ताराचे अस्तित्व संपूर्ण जाणार आहे. यानंतर सिंगापूर एअरलाईन्सचा एअर इंडियामध्ये २५.१ टक्के हिस्सा असेल.
गेल्या वर्षी जानेवारीमध्ये सरकारकडून एअर इंडियाचे नियंत्रण आपल्या हातात घेतल्यानंतर टाटा समूह एअर इंडियाच्या पूर्नरचनेच्या पाठी लागले आहे. या क्रमाने विस्ताराचे विलीनीकरण एअर इंडियामध्ये केले जात आहे. तर एअर एशिया इंडियाचे विलीनीकरण एअर इंडिया एक्सप्रेससह केले जाणार आहे. एअर इंडियामध्ये विस्ताराचे विलीनीकरण पुढील वर्षी २०२४ मध्ये पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.