मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  DRDO Recruitment 2022: दहावी पाससाठी नोकरीची संधी! हजारो पदांसाठी भरती, पगार १ लाख १२ हजारांपर्यंत

DRDO Recruitment 2022: दहावी पाससाठी नोकरीची संधी! हजारो पदांसाठी भरती, पगार १ लाख १२ हजारांपर्यंत

Tejashree Tanaji Gaikwad HT Marathi
Aug 24, 2022 02:08 PM IST

या भरतीअंतर्गत हजारो पदांची भरती केली जाणार आहे.

नोकरीची संधी
नोकरीची संधी (HT)

सरकारी नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांसाठी सुवर्णसंधी चालून आली आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संघटना (DRDO), सेंटर फॉर पर्सोनेल टॅलेंट मॅनेजमेंट (CEPTAM) लवकरच १० DRTC (संरक्षण संशोधन तांत्रिक संवर्ग) अंतर्गत विविध पदांसाठी भरती प्रसिद्ध करणार आहे. या भरतीअंतर्गत हजारो पदांची भरती केली जाणार आहे. या भरतीमध्ये सहभागी होऊ इच्छिणारे सर्व उमेदवार डीआरडीओच्या अधिकृत वेबसाइट drdo.gov.in वर जाऊन ही अधिसूचना तपासू आणि डाउनलोड करू शकतील.

ट्रेंडिंग न्यूज

'या' पदांवर होणार भरती

डीआरडीओद्वारे जारी करण्यात आलेल्या या भरती अंतर्गत, वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक-बी (STA-B) आणि तंत्रज्ञ-ए (Tech-A) या पदांवर भरती केली जाईल. या पदांवरील उमेदवारांच्या भरतीसाठी, डीआरडीओद्वारे परीक्षा घेतली जाईल.

दहावी पास करू शकतात अर्ज

दहावी उत्तीर्ण उमेदवार डीआरडीओद्वारे जारी करण्यात येणाऱ्या वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक-बी (STA-B) आणि तंत्रज्ञ-ए (Tech-A) भरतीसाठी देखील अर्ज करू शकतील. भरतीचे तपशीलवार वेळापत्रक लवकरच अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध केले जाईल. अर्जदारांची वयोमर्यादा किमान १८ वर्षे आणि कमाल २८ वर्षे असावी.

शैक्षणिक पात्रता काय असावी?

वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे विज्ञान किंवा अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञान किंवा संगणक विज्ञान किंवा संबंधित विषयातील डिप्लोमा पदवी असणे आवश्यक आहे. तंत्रज्ञ-ए पदांसाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवारांनी मान्यताप्राप्त बोर्ड किंवा संस्थेतून दहावी उत्तीर्ण किंवा त्याच्या समकक्ष आणि मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे आयटीआय प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

पगार किती मिळणार?

वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक – ३५४०० ते ११२४०० रुपये प्रति महिना

तंत्रज्ञ ए - १९९०० ते ६३२०० रुपये प्रति महिना

IPL_Entry_Point

विभाग