मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  VIRAL VIDEO : दर्शनासाठी गेलेला भक्त हत्तीच्या पुतळ्याखाली अडकला; व्हिडिओ व्हायरल

VIRAL VIDEO : दर्शनासाठी गेलेला भक्त हत्तीच्या पुतळ्याखाली अडकला; व्हिडिओ व्हायरल

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Dec 06, 2022 10:55 AM IST

Gujarat Viral Video : मंदिरात गेल्यानंतर तरुणानं हत्तीच्या मूर्तीच्या दर्शनासाठी लोटांगण घातलं. परंतु तो मूर्तीच्या आतल्या भागात अडकल्याचा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Viral Video On Social Media
Viral Video On Social Media (HT)

Viral Video On Social Media : अनेक लोक इच्छा आणि आकांक्षा पूर्ण करण्यासाठी देवाला नवस करत असतात. त्यासाठी अनेक विचित्र विधीदेखील पार पाडत असतात. परंतु असं करणं कधी कधी महागात पडण्याची शक्यता असते, असाच काहीसा प्रकार गुजरातमधील एका भक्तासोबत घडला आहे. मंदिरातील हत्तीच्या पुतळ्यासमोर लोटांगण घालत असताना एक तरुण भाविक मूर्तीच्या एकदम मधोमध अडकला. त्यामुळं त्याला बाहेर पडणं कठीण झालं होतं. त्याचा एक व्हिडिओही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओनुसार, एका तरुण भाविकानं नवस केला होता. त्यावेळी मंदिरात येऊन धार्मिक विधी करत असताना तो अचानक हत्तीच्या मूर्तीच्या मधोमध फसला. यावेळी त्यानं मूर्तीच्या बाहेर पडण्यासाठी जीवाच्या आकांतानं प्रयत्न केला. परंतु त्याला बाहेर पडण्यासाठी जागाच नसल्यानं तो ओरडू लागला. त्यानंतर मंदिरातील इतर भाविकांनी तिथं पोहचत त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. याशिवाय काही लोकांनी त्याला अंग बारिक करून किंवा सरपडत बाहेर निघण्यासाठी टिप्सही सांगितल्या. परंतु तो बाहेर पडला की नाही, हे व्हायरल होत असलेल्या व्हिडिओतून स्पष्ट झालेलं नाही. परंतु या व्हिडिओला आतापर्यंत ४० हजारांहून अधिक लोकांनी पाहिलं आहे.

२०१९ साली एक महिला भक्त मंदिरात दर्शनासाठी आल्यानंतर ती धार्मिक विधी करत असताना हत्तीच्या मूर्तीमध्ये अडकल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. त्यानंतर आता गुजरातच्या एका मंदिरात तरुण भाविक हत्तीच्या मूर्तीत अडकल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळं आता भक्तांनी मंदिरात दर्शन घेताना अधिकची खबरदारी बाळगण्याची आवश्यकता असल्याचं बोललं जात आहे.

IPL_Entry_Point