मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  प्रियंका गांधी ज्या गुलाबांवर चालल्या, त्या फुलांपासून काँग्रेस बनवणार गुलाल; भाजप म्हणतो…

प्रियंका गांधी ज्या गुलाबांवर चालल्या, त्या फुलांपासून काँग्रेस बनवणार गुलाल; भाजप म्हणतो…

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Mar 01, 2023 02:01 PM IST

Gulal from the roses : कॉंग्रेस महाअधिवेशनात प्रियंका गांधी यांच्या स्वागतासाठी रस्त्यावर गुलाबाची फुले टाकण्यात आली होती. तब्बल २ किमी पर्यंत फुलांची सजावट करण्यात आली होती. यासाठी ६ हजार किलो पेक्षा अधिक गुलाबाच्या फुलांचा वापर करण्यात आला होता. या फुलांपासून गुलाल बनवण्यात येणार असल्याचे कॉँग्रेसने म्हटले असून यावरुन भाजप आक्रमक झाली आहे.

प्रियंका गांधी
प्रियंका गांधी

Congress News : होळी पूर्वीच कॉँग्रेस शासित छत्तीसगड  येथे 'गुलाल' च्या मुद्यावरून राजकारण तापले आहे. कॉँग्रेस अधिवेशनात प्रियंका गांधी यांच्या स्वागतासाठी तब्बल २ किमी पर्यंत ६ हजार किलो गुलाबाच्या फुलांच्या पायघड्या घालण्यात आल्या होत्या. या फुलांपासून कॉँग्रेस गुलाल तयार करणार असून याचा वापर होळी यांनी रंगपंचमी साठी केला जाणार आहे. दरम्यान, या वरून भाजपने आक्रमक पवित्रा घेत हा  प्रकार म्हणजे नागरिकांच्या भावना दुखवण्याचा प्रकार असल्याचा आरोप केला आहे.

छत्तीसगड येथे कॉँग्रेसच्या महाअधिवेशना दरम्यान प्रियंका गांधी यांच्या स्वागतासाठी रस्त्यावर गुलाबाच्या फुलांच्या पायघड्या घालण्यात आल्या होत्या. तब्बल २ किमी पर्यंत रस्त्यावर गुलाबाची फुले टाकण्यात आली होती. या साठी तब्बल ६ हजार किलोपेक्षा अधिक फुलांचा वापर करण्यात आला होता. तर गांधी यांच्यावर वरून फुलांचा वर्षाव देखील करण्यात आला होता. रायपूर येथे हे अधिवेशन २४ ते २६ फेब्रुवारी दरम्यान, झाले होते. दरम्यान, या फुलांचा वापर करून कॉँग्रेस गुलाल बनवण्याच्या तयारीत आहे. यावरुन भाजप आक्रमक झाली आहे. हा प्रकार म्हणजे सनातन हिंदू धर्माचा अपमान आहे असे भाजप नेत्यांचे म्हणणे आहे. माजी मंत्री आणि भाजपचे प्रवक्ता राजेश मुनोत म्हणाले, कॉँग्रेस कार्यकर्त्यांनी रस्त्यावर गुलाब टाकून ज्या पद्धतीने स्वागत केले, त्याचा आम्ही सन्मान करतो. ही फुले हजारो नागरिकांच्या पायाखाली दबले गेले. दरम्यान, मुख्यमंत्री भूपेश बहल यांचे सरकार या फुलांपासून गुलाल बनवण्याच्या तयारीत आहेत. हिंदू सनातन धर्माचा अपमान करण्यासाठी हा प्रकार सुरू आहे, असा आरोप त्यांनी केला आहे. ते म्हणाले, सनातन धर्मात गुलालाचा वापर हा देवाची आराधना करण्यासाठी केला जातो. तर होळीत मोठ्या नागरिकांना हा गुलाल लावला जातो. मात्र, नागरिकांच्या पायाखानली दाबलेल्या गुलाबाचा वापर करणे हे चुकीचे आहे. जर त्यांना अपमान वाटत नसेल तर त्यांनी या गुलालाचा वापर त्यांच्या नेत्यासाठी करावा.

यावर कॉँग्रेस नेता सुशील आनंद शूक्ला म्हणाले, फुलांचा वापर हा देवाला वाहण्यासाठी किवा शुभेच्छा गुच्छ बनवण्यासाठी केला तरी त्यानंतर त्याचा वापर हा अत्तर, अगरबत्ती, गुलाल बनवण्यासाठी केला जातो. जेव्हा त्यांचा पुनरवापर करून नव्याने बनवले जाते तेव्हा त्याचा पुन्हा नव्याने वापर केला जातो. मूनत यांना सनातन धर्म म्हणजे काय हे माहिती नाही. यामुळे याची माहिती त्यांनी एखाद्या सनातनी ब्राम्हणाकडून घ्यावी असा टोला देखील त्यांनी लगावला आहे.

IPL_Entry_Point

विभाग