मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Unemployment: बारावी पास तरुणांना मिळणार २५०० रुपये बेरोजगारी भत्ता; ‘या’ राज्याचा मोठा निर्णय

Unemployment: बारावी पास तरुणांना मिळणार २५०० रुपये बेरोजगारी भत्ता; ‘या’ राज्याचा मोठा निर्णय

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Mar 06, 2023 04:41 PM IST

Unemployment Allowance : बारावी पास झालेल्या तरुणांना महिन्याकाठी २५०० रुपयांचा बेरोजगारी भत्ता देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Unemployment Allowance In Chhattisgarh
Unemployment Allowance In Chhattisgarh (HT)

Unemployment Allowance In Chhattisgarh : गेल्या काही वर्षांपासून देशातील अनेक राज्यांमध्ये रोजगाराचा प्रश्न गंभीर होत असल्याचं चित्र असतानाच आता छत्तीसगड सरकारनं तरुणांना तब्बल २५०० रुपयांचा बेरोजगारी भत्ता देण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी छत्तीगसडच्या विधानसभेच्या मांडलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात याची घोषणा केली आहे. पुढील काही महिन्यात छत्तीसगडमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहे, त्यापूर्वीच मुख्यमंत्री बघेल यांनी तरुणांना बेरोजगारी भ्ता देण्याचा निर्णय घेतल्यामुळं आता त्यावरून राजकीय वादंग पेटण्याची शक्यता आहे.

छत्तीसगडमधील बारावी पास असलेल्या आणि अडीच लाखांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या बेरोजगार तरुणांना सरकारतर्फे मासिक २५०० रुपयांचा भत्ता दिला जाणार असल्याची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी केली आहे. १८ ते ३५ या वयोगटातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना सुरुवातीच्या दोन वर्षांपर्यंत हा बेरोजगारी भत्ता दिला जाणार असल्याचंही मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी म्हटलं आहे. त्यामुळं आता ज्या तरुणांचं शिक्षण संपूनही त्यांना काम मिळालेलं नाही त्यांना छत्तीसगड सरकारतर्फे मोठा दिलासा मिळाला आहे.

छत्तीसगडमधील बेरोजगार तरुणांना भत्ता देण्यासाठी नवी योजना सुरू केली जाणार आहे. त्यासाठी छत्तीसगड सरकारनं २५० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. सुशिक्षित तरुणांची नोंदणी केल्यानंतर त्यांना नव्यानं अर्ज भरल्यानंतर पुढील प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. तरुणांनी एकदा अर्ज भरल्यानंतर सलग दोन वर्ष महिन्याकाठी २५०० रुपये त्यांच्या खात्यात जमा केले जाणार आहे. दोन वर्षे या योजनेचा लाभ घेतल्यानंतर संबंधित तरुणांसाठी ही योजना बंद केली जाणार आहे. त्यामुळं आता छत्तीसगड सरकारनं घेतलेल्या या निर्णयाला आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं मोठं राजकीय महत्त्व प्राप्त झालं आहे.

IPL_Entry_Point