मराठी बातम्या  /  Maharashtra  /  Stage Collapsed In Program Of Ncp Leader Jitendra Awad In Mumbra Thane

Jitendra Awhad : खुर्चीवर बसताच भलंमोठं स्टेज कोसळलं; जितेंद्र आव्हाड थोडक्यात बचावले!

Jitendra Awhad Viral Video
Jitendra Awhad Viral Video (HT)
Atik Sikandar Shaikh • HT Marathi
Mar 06, 2023 03:23 PM IST

Jitendra Awhad Live News : खुर्चीवर बसत असतानाच स्टेज कोसळल्यानं आमदार जितेंद्र आव्हाड हे थोडक्यात बचावल्याची घटना समोर आली आहे.

Jitendra Awhad Viral Video : गेल्या काही दिवसांपासून सत्ताधारी शिंदे गट आणि राष्ट्रवादीचे आमदार आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यात जोरदार आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी रंगलेल्या आहेत. याशिवाय ठाण्यातील मुंब्र्यात एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी जाहीर सभा घेतल्यामुळं आव्हाड यांच्या अडचणी वाढलेल्या आहे. त्यातच आता जितेंद्र आव्हाडांसोबत छोटीशी दुर्घटना घडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. खुर्चीवर बसत असताना अचानक स्टेज खाली कोसळल्यामुळं जितेंद्र आव्हाड हे थोडक्यात बचावले आहे. त्यामुळं या घटनेमुळं राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

ट्रेंडिंग न्यूज

ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा येथील आमदार प्रीमियर लीगच्या क्रिकेट स्पर्धेत जितेंद्र आव्हाड यांनी हजेरी लावली. मैदानाच्या बाजूलाच स्टेज उभारण्यात आलेलं होतं. आव्हाड आपल्या समर्थकांसह स्टेजवर चढले. खुर्चीवर बसत असतानाच स्टेज खाली कोसळलं. त्यानंतर उपस्थितांनी आव्हाडांचा तोल सावरत त्यांना वाचवलं. त्यामुळं मोठी दुर्घटना टळली आहे. त्यानंतर सर्वजण स्टेजपासून दूर झाले आणि जितेंद्र आव्हाड यांना धोकादायक स्टेजपासून दूर नेण्यात आलं. क्षमतेपेक्षा जास्त लोक स्टेजवर चढल्यामुळं स्टेजचा एक भाग खाली कोसळला होता. स्टेज कोसळल्यामुळं घटनास्थळी मोठ्या प्रमाणात गोंधळ उडाला होता. त्यानंतर पुढील कार्यक्रमाची व्यवस्था दुसऱ्या ठिकाणी करण्यात आली.

ठाण्यात आव्हाड-शिंदे आमनेसामने...

राज्यात सत्तांतर झाल्यापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी रंगलेल्या आहेत. याशिवाय जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आल्यामुळं त्यावरून राजकीय वादंग पेटलं होतं. त्यानंतर आता मुंब्र्यातील कार्यक्रमात स्टेज कोसळल्यामुळं जितेंद्र आव्हाड थोडक्यात बचावल्यामुळं त्यांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

WhatsApp channel