मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Pathaan Boycott : पठाणला बॉयकॉट करणाऱ्यांना केंद्रीय मंत्री अनुराग ठाकुर यांनी फटकारलं, म्हणाले...

Pathaan Boycott : पठाणला बॉयकॉट करणाऱ्यांना केंद्रीय मंत्री अनुराग ठाकुर यांनी फटकारलं, म्हणाले...

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Jan 27, 2023 10:56 PM IST

Anurag Thakur On Pathaan Movie : बेशरम रंग या गाण्यातील अभिनेत्री दीपिका पादुकोनच्या भगव्या बिकीनीमुळं भाजप नेत्यांसह हिंदुत्ववादी संघटनांनी पठाण चित्रपटाला बॉयकॉट करण्याची घोषणा केली होती.

Anurag Thakur On Pathaan Boycott Controversy
Anurag Thakur On Pathaan Boycott Controversy (HT)

Anurag Thakur On Pathaan Boycott Controversy : पठाण चित्रपटातील बेशरम रंग या गाण्यात अभिनेत्री दीपिका पादुकोनने भगवी बिकीनी घातल्याच्या मुद्द्यावरून भाजपच्या अनेक नेत्यांसह हिंदुत्ववादी संघटनांनी पठाण चित्रपटाला बॉयकॉट करण्याची घोषणा केली होती. चित्रपट प्रदर्शित होण्यापू्र्वी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पठाणचे पोस्टर फाडत चित्रपटाला विरोध केला होता. परंतु अखेर सेन्सॉर बोर्डानं चित्रपटातील काही सीन्स हटवल्यानंतर आता दोन दिवसांपूर्वी पठाण चित्रपट प्रदर्शित झाला आहे. परंतु चित्रपटावरून झालेल्या गदारोळानंतर आता भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी पठाणला बॉयकॉट करणाऱ्यांना चांगलंच सुनावलं आहे.

माध्यमांशी बोलताना केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले की, भारत सध्या जगभरात आपली सॉफ्ट पॉवर वाढवत असताना बहिष्कार करणारी संस्कृती देशातील वातावरण खराब करत आहे. कुणाला चित्रपटातील दृष्यांवर आक्षेप असेल तर त्यांनी त्याची रितसर तक्रार सरकारकडे केल्यास त्यावर कारवाई होऊ शकते. परंतु अनेक चित्रपट जगभरात भारताचं नाव मोठं करत असताना बॉटकॉट कल्चर देशातील वातावरण खराब करत असल्याचं सांगत अनुराग ठाकूर यांनी भाजपसह हिंदुत्ववादी संघटनेच्या नेत्यांना चांगलंच सुनावलं आहे.

पठाण चित्रपटात हिंदू धर्माचा अपमान झाल्याचा आरोप करत अनेक हिंदुत्ववादी संघटनांनी पठाण चित्रपटाला बॉयकॉट करण्याची मोहिम हाती घेतली होती. याशिवाय भाजप नेत्यांनीही पठाण चित्रपटासह त्यात मुख्य भूमिकेत असलेल्या शाहरुख खानवर टिकास्त्र सोडलं होतं. परंतु आता केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी बॉयकॉट करणाऱ्यांवर सडकून टीका केली आहे. यापूर्वी अभिनेता अक्षय कुमारचा सम्राट पृथ्वीराज, आमिर खानचा लाल सिंह चड्ढा आणि रणवीर सिंह याच्या पद्मावत चित्रपटाविरोधात बॉयकॉट करण्यात आला होता.

IPL_Entry_Point