मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Swara Bhaskar : राहुल गांधींचं कौतुक करत स्वरा भास्करचा भारत जोडो यात्रेला पाठिंबा, म्हणाली…

Swara Bhaskar : राहुल गांधींचं कौतुक करत स्वरा भास्करचा भारत जोडो यात्रेला पाठिंबा, म्हणाली…

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Oct 29, 2022 10:19 AM IST

Swara Bhaskar On Rahul Gandhi : देशातील सध्याची स्थिती पाहता राहुल गांधींनी केलेले प्रयत्न कौतुकास्पद असल्याचं बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करनं म्हटलं आहे.

Swara Bhaskar On Rahul Gandhi
Swara Bhaskar On Rahul Gandhi (HT)

Swara Bhaskar On Rahul Gandhi : देशभरात कॉंग्रेसला लागलेली गळती आणि अनेक राज्यांमधून सत्ता गमावल्यानंतर राहुल गांधी यांच्या नेत्तृत्वाखाली कॉंग्रेसनं भारत जोडो यात्रा सुरू केली आहे. ही यात्रा कन्याकुमारी ते श्रीनगर असा ३५०० किलोमीटरचा प्रवास करत केंद्रातील मोदी सरकारविरोधात रान पेटवत आहे. राहुल गांधींनी आतापर्यंत २२५९ किलोमीटरची पदयात्रा केली असून केरळ, तामिळनाडू, कर्नाटकनंतर आता तेलंगणात दाखल झाले आहेत. त्यानंतर आता त्यांनी काढलेल्या या यात्रेवरून बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करनं राहुल गांधींचं कौतुक करत भारत जोडो यात्रेला पाठिंबा दिला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

यासंदर्भात अभिनेत्री स्वरा भास्करनं ट्विटरवर एनडीटीव्हीच्या प्राइम टाइमचा एक व्हिडिओ शेयर केला आहे. त्यात तिनं म्हटलंय की, अनेक निवडणुकीतील पराभव, सततची टीका आणि ट्रोलिंग होऊनही जातीय आणि धार्मिक राजकारणापुढे राहुल गांधी झुकले नाहीत. सध्याची देशातील स्थिती पाहता राहुल गांधींनी केलेले प्रयत्न कौतुकास्पद असल्याचं स्वरा भास्करनं म्हटलं आहे.

बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर नेहमीच तिच्या वादग्रस्त आणि बिनधास्त वक्तव्यांमुळं सोशल मीडियावर चर्चेत असते. त्यावरून तिला अनेकदा ट्रोलिंगचा सामना करावा लागलेला आहे. त्यातच आता तिनं राहुल गांधींचं कौतुक करत भारत जोडो यात्रेला पाठिंबा दिला आहे.

IPL_Entry_Point