मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Assembly election 2023 : त्रिपुरा, नागालँड व मेघालय विधानसभा निवडणुकाचे बिगुल वाजले; पाहा वेळापत्रक

Assembly election 2023 : त्रिपुरा, नागालँड व मेघालय विधानसभा निवडणुकाचे बिगुल वाजले; पाहा वेळापत्रक

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Feb 17, 2023 11:17 AM IST

Assembly election dates : केंद्रीय निवडणूक आयोगाने त्रिपुरा, नागालँड व मेघालय विधानसभा निवडणुकांची घोषणा केली असून तिन्ही विधानसभांसाठी २ मोर्च रोजी मतमोजणी होणार आहे.

Assembly election 2023
Assembly election 2023

नवी दिल्ली – ईशान्य भारतातील तीन राज्ये त्रिपुरा, नागालँड आणि मेघालय या तीन विधानसभा निवडणुकाची घोषणा निवडणूक आयोगाने केली आहे. निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. तिन्ही राज्यात एकाच टप्प्यात मतदान प्रक्रिया राबवली जाणार आहे. त्रिपुरामध्ये १६ फेब्रुवारीला मतदान होणार आहे तर मेघालय आणि नागालँडमध्ये २७ फेब्रुवारी मतदान होईल. तिन्ही विधानसभा निवडणकांची मतमोजणी व निकाल २ मार्चला जाहीर होणार आहे. महाराष्ट्रातील पुण्यात दोन मतदारसंघात पोटनिवडणुका घेण्यात येणार असून २७ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

चुनाव आयोगाने ईशान्येकडील तीन राज्यांच्या विधानसभा निवडणूक तारखांची घोषणा केली आहे. नागालँड, त्रिपुरा आणि मेघालयमध्ये फेब्रुवारीमध्ये निवडणूक होणार आहे. त्रिपुरा विधानसभेच्या ६० जागांसाठी १६ फेब्रुवारी रोजी मतदान केले जाईल. तसेच मेघालय आणि नागालँडच्या ६०-६० जागांसाठी १७ फेब्रुवारी रोजी मतदान होईल. तिन्ही राज्यांतील निवडणुकांचा निकाल २ मार्च रोजी जाहीर केला जाणार आहे.

मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी म्हटले की, त्रिपुरा, नागालँड आणि मेघालयाच निवडणुकांची चर्चा होत आहे. तिन्ही विधानसभांची मुदत मार्चमध्ये संपत आहे. तिन्ही विधानसभेची सदस्य संख्या ६० आहे. या तिन्ही राज्यातील निवडणुकांत महिलांचा सहभाग पुरुषांहून अधिक आहे.

तीन राज्यांचा निवडणूक कार्यक्रम
तीन राज्यांचा निवडणूक कार्यक्रम

त्यांनी म्हटले की, या राज्यातील मागील निवडणुकांत कोणतीही हिंसा झालेली नाही. एसएसआरचे कार्य ५ जानेवारी रोजी पूर्ण झाले आहे आणि लिस्ट प्रसिद्ध करण्यात आली आहे. तीन राज्यात २.२८ लाख मतदारांचा नव्याने समावेश करण्यात आला आहे. २ हजारहून अधिक मतदार असे आहेत, ज्यांचे वय १०० वर्षाहून अधिक आहे. त्यांच्या मतदानासाठीही व्यवस्था केली जाईल.

नागालँड, मेघालय आणि त्रिपुरा विधानसभेचा पाच वर्षाचा कार्यकाळ १२ मार्च, २२ मार्च आणि १५ मार्च रोजी संपणार आहे. त्यापूर्वी नव्या विधानसभेचे गठण केले जाईल. सध्या त्रिपुरामध्ये भाजपचे सरकार आहे. त्रिपुरामध्ये डावी आघाडी व आदिवासी पार्टी भाजपाला आव्हान देऊ शकतात.

 

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या