Facebook Layoffs: फेसबुकनं १० हजार कर्मचाऱ्यांना काढलं; ई-मेल करून नोकरी गेल्याचं सांगितलं!
Meta Layoffs: मेटामध्ये कर्मचाऱ्यांची कपात सुरूच आहे. मेटाने तब्बल १० हजार कर्मचाऱ्यांन ईमेल धाडत कामावर न येण्याचे सांगितले आहे. या पूर्वही मार्च महिन्यात कंपनीने ११हजार कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवला होता.
Meta Layoffs: जगभरातील आघाडीच्या टेक कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात सुरू केली आहे. हजारो कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात आले आहे. हे धोरण सुरूच आहे. सोशल नेटवर्किंग मधील आघाडीची कंपनी असलेल्या मेटा कंपनीनेही ११ हजार कर्मचाऱ्यांची कपात केल्यावर आता पुन्हा १० हजार कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवला आहे. या कर्मचाऱ्यांना ईमेल द्वारे कामावर न येण्याचे सांगण्यात आले आहे.
ट्रेंडिंग न्यूज
अनेक टेक कंपन्यांनी कॉस्ट कटिंगच्या नावाखाली कर्मचारी कपात सुरू केली आहे. मोठ्या प्रमाणात ही कपात सुरू आहे. मेटाने मार्च महिन्यात कर्मचारी कपात जाहीर केली होती. याची अमलबजावणी सुरू करण्यात आली असून १० हजार कर्मचाऱ्यांना ईमेल पाठवत कामावरून कमी करण्यात आले आहे. फेसबुक, व्हॉट्सअॅप आणि इंस्टाग्रामचीमध्ये काम करणारे हे कर्मचारी आहेत. दरम्यान, या पूर्वही गेल्या वर्षी नोव्हेंबरमहिन्यात मेटा ने ११ हजार कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवला होता. या कर्मचारी कपातीची माहिती मेटाने LinkedIn च्या माध्यमातून दिली आहे.
मेटा प्रमाणेच अमेरिकेतील सर्वात मोठी मास मीडिया आणि मनोरंजन कंपनी असलेल्या वॉल्ट डिस्नेनेही आर्थिक गर्तेत असून तब्बल ४ हजार कर्मचाऱ्यांना त्यांची नोकरी जाण्याची भीती आहे.
सध्या जगात असलेली आर्थिक मंदी ही या कर्मचारी कपाती मागे असल्याचे बोलले जात आहे. अनेक टेक कंपन्या या आपले आर्थिक घडी विस्कटण्यापूर्वी कर्मचारी कपातीचे धोरण अवलंबत आहे. अॅक्सेंचर, अॅमेझॉन, मेटा या सारख्या अनेक कंपन्यांनी या पूर्वी मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात केली आहे. या कंपन्या आर्टिफिशिअल इंटेलिजन्सवर मोठ्या प्रमाणात काम करत असून या ठिकाणी मानवी काम कमी झाल्याने देखील नवीन भरती थांबवण्यात आल्या आहेत.