Pune fire : पुण्यात टिंबर मार्केटमध्ये अग्नितांडव; लाकडाच्या गोदामाला भीषण आग
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune fire : पुण्यात टिंबर मार्केटमध्ये अग्नितांडव; लाकडाच्या गोदामाला भीषण आग

Pune fire : पुण्यात टिंबर मार्केटमध्ये अग्नितांडव; लाकडाच्या गोदामाला भीषण आग

May 25, 2023 06:51 AM IST

Pune Timber market fire : पुण्यातील भवानी पेठ येथील टिंबर मार्केटमध्ये एका लाकडाच्या गोदामाला भीषण आग लागली आहे. ही घटना पहाटेच्या सुमारास घडली.

Pune Timber market fire
Pune Timber market fire

पुणे : पुण्यात आज सकाळी पहाटे ४ वाजता भवानी पेठेतील टिंबर मार्केटमध्ये एका लाकडाच्या गोदामाला भीषण आग लागली. ही आग भीषण असून आगीचे आणि धुराचे लोट दूरवरुन दिसत होते. अग्निशामक दलाचे तब्बल ३०  बंब घटनास्थळी पोहचले असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, ही आग कशामुळे लागली हे समजू शकले नाही.

 

पुण्यात भवानी पेठ येथील टिंबर मार्केट प्रसिद्ध आहे. या ठिकाणी लाकडाच्या ऊतम वस्तु मिळतात. रोज या ठिकाणी मोठी उलाढाल होत असते. या ठिकाणी अनेक गोदामे असून या ठिकाणी अनेक व्यापाऱ्यांनी आपला लाकडाचा माल साठवून ठेवला आहे. दरम्यान, आज सकाळी ४.१४ वाजता येथील रामोशी गेटनजीक लाकूड सामान असलेल्या एका गोडाऊनला भीषण आग लागल्याची माहिती पुणे अग्निशामक दलाला मिळाली.

ही आग एवढी भीषण आहे की यात लाखोंच्या लाकडाचे जळून नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या घटनेची माहिती मिळताच पुणे-पुणे कॅन्टोमेंट-पीएमआरडीए आणि पालिकेच्या अग्निशमन दलाची एकुण ३० अग्निशमन वाहने घटनास्थळी दाखल झाली असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू आहे. आग एवढी भीषण असल्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पथकाला अडचणी येत असल्याची माहिती पुणे अग्निशामक दलाचे प्रसिद्धी प्रमुख नीलेश महाजन यांनी माहिती दिली.

दरम्यान, आगीची झळ  शेजारील चार घरांना बसली आहे. जवानांनी प्रथमत आग वस्तीमधे व शेजारील शाळेमध्ये पसरु न दिल्याने व सुमारे १० सिलेंडर बाहेर काढल्याने मोठा धोका टळला.  अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. सुदैवाने या घटणे कुणी जखमी वा जिवितहानी झाली नाही. मुख्य अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे यांच्यासमवेत इतर २० अधिकारी व जवळपास १०० जवान आणि पुणेमनपा- पुणेकॅन्टोमेंट-पीएमआरडीए-पिंपरीचिंचवड अग्निशमन दल अशी एकुण जवळपास ३० अग्निशमन वाहने व खाजगी वॉटर टँकर या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत अशी माहिती नीलेश महाजन यांनी दिली. 

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर