मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Shraddha Murder : शिमल्यात आफताब-श्रद्धानं गांजा खरेदी केला होता; पोलिसांनी पुराव्यांसह मांडलं सत्य

Shraddha Murder : शिमल्यात आफताब-श्रद्धानं गांजा खरेदी केला होता; पोलिसांनी पुराव्यांसह मांडलं सत्य

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Nov 23, 2022 11:54 AM IST

Shraddha Murder Case : श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणात आरोपी आफताब पुनावालानं कोर्टात गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्यानंतर आता पोलिसांनी आफताबकडून काही जुनी बिलं जप्त केली आहे.

Shraddha Murder Case In Delhi
Shraddha Murder Case In Delhi (HT)

Shraddha Murder Case In Delhi : मुंबईकर श्रद्धा वालकरची तिचा प्रियकर आफताब पुनावालानं दिल्लीत अत्यंत निर्घृणपणे हत्या केल्याच्या घटनेनं देशभरात खळबळ उडाली आहे. तब्बल सहा महिन्यानंतर घटनेचा भांडाफोड झाल्यानं पोलिसांनी पोलिसांनी या प्रकरणाचा कसून तपास सुरू केला आहे. त्यासाठी सहा राज्यांतील पोलीस आणि फॉरेन्सिक विभागाचे काही अधिकारी या प्रकरणाच्या तपासात काम करत असल्याची माहिती आहे. काल आरोपी आफताबला दिल्लीतील साकेत कोर्टात सुनावणीसाठी हजर करण्यात आलं होतं. त्यावेळी त्यानं रागाच्या भरात श्रद्धाची हत्या केल्याची कबुली दिली आहे. त्यानंतर आता पोलीस तपासात आणखी एक मोठा खुलासा झाला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

पोलिसांनी आफताबला काल दिल्लीतील साकेत कोर्टात सुनावणीसाठी हजर केलं. त्यानंतर पोलिसांनी त्याची चौकशी केली असता त्यानं श्रद्धासोबत हिमाचल प्रदेशातील शिमल्यात गेल्यानंतर गांजाची खरेदी केल्याची कबुली दिली आहे. त्यासंदर्भात पोलिसांना आफताबच्या मोबाईलवरील डिजीटल पेमेंट्सचे तपशील सापडले आहेत. त्यामुळं आता आरोपी आफताबच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

आफताब आणि श्रद्धा हिमाचलहून १२ मे रोजी दिल्लीत परतले होते. त्यावेळी ते दोघेही एका हॉटेलमध्ये थांबले होते. त्यानंतर काही दिवसांतच आफताबनं श्रद्धाची हत्या केली. श्रद्धाची हत्या करताना आफताब नशेत होता, अशी माहिती काही दिवसांपूर्वी समोर आली होती. त्यामुळं आता हिमाचल प्रदेशातून खरेदी केलेल्या गांजाचं सेवन आफताबनं श्रद्धाची हत्या करताना केलेलं होतं का?, याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. याशिवाय आता आरोपी आफताबनं शिमल्यातून ज्या ठिकाणाहून गांजा खरेदी केली त्या ठिकाणी पोलीस आफताबला घेऊन अधिक तपास करण्यासाठी जाण्याची शक्यता आहे.

IPL_Entry_Point