मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune water Cut : पुणेकरांवर पाणीकपातीचे संकट; धरणात उरला जुलैपर्यंत पुरेल एवढाच पाणीसाठा

Pune water Cut : पुणेकरांवर पाणीकपातीचे संकट; धरणात उरला जुलैपर्यंत पुरेल एवढाच पाणीसाठा

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Apr 26, 2023 01:11 PM IST

Pune water Cut : पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धारणांमध्ये जुलैपर्यंत एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे पुणेकरांवर पाणी कपातीची टांगती तलवार लटकलेली आहे. आज होणाऱ्या कालवासमितीच्या बैठकीत या बाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.

Pune water Cut
Pune water Cut

पुणे : पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीत जुलैपर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा शिल्लक असल्याने पुणे शहरावर पाणी कपातीची टांगती तलवार आहे. या बाबत खुद्द पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी संकेत दिले असून पाणी जपून वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आज होणाऱ्या कालवा समितीच्या बैठकीत हा निर्णय होण्याची शक्यता आहे.

Mumbai Crime : मुंबई हादरली! पत्नीच्या चारित्र्यावरील संशयातून ११ वर्षांच्या मुलीची हत्या; नंतर स्वत:ही केली आत्महत्या

आज होणाऱ्या कालवा समितीच्या बैठकीत विरोधिपक्षनेते अजित पवार, पालकमंत्री चंद्रकात पाटील आणि जिल्ह्यातील आमदार उपस्थित राहणार आहे. पुण्याला खडकवासला प्रकल्पातील वरसगांव, टेमघर, पानशेत आणि खडकवासला धरणातून पाणी पुरवठा केला जातो. या चारही धरणात जुलै पर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा शिल्लक आहे.

Mumbai Goa Highway Accident : मुंबई-गोवा मार्गावर शिवशाही बसला भीषण अपघात; १ ठार, २२ प्रवासी जखमी

खडकवासला धरणात १.०७ टीएमसी, पानशेत धरणात ३.४१ टीएमसी, वरसगाव धरणात ६.८५ टीएमसी, टेमघर धरणात ०.२८ टीएमसी असा पाणीसाठा शिल्लक आहे. पुण्याला दर महिन्याला तब्बल सव्वा टीएमसी पाणी लागते. मात्र, यावर्षी एप्रिल महिन्यातच या चारही धारणांनी तळ गाठला आहे. त्यामुळे पुण्यात पाणी कपात होण्याची शक्यता आहे. आज होणाऱ्या कालवा समितीच्या बैठकीत या बाबत निर्णय होण्याचे संकेत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत.

शहर आणि शेतीसाठी असे दरवर्षी पाण्याचे नियोजन केले जाते. हे नियोजन १५ जुलैपर्यंत केले जाते. यावर्षी अलनिनोच्या प्रभावामुळे पावसाला विलंब होण्याचा आणि पावसाचे प्रमाण कमी राहण्याचा अंदाज वेधशाळेने दिल्याने पालिकेने पाणीकपातीची तयारी सुरू केली आहे. त्यानुसार ३१ ऑगस्टपर्यंत पाण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे शहरात आठवड्यातून एक दिवस पाणी बंदचा निर्णय घेतला जाऊ शकतो.

IPL_Entry_Point

विभाग