मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  संभाजीनगर हादरलं.. प्राध्यापकाचा विद्यार्थिनीवर वारंवार बलात्कार, पत्नीकडे तक्रार केल्यावर तिचे धक्कादायक उत्तर

संभाजीनगर हादरलं.. प्राध्यापकाचा विद्यार्थिनीवर वारंवार बलात्कार, पत्नीकडे तक्रार केल्यावर तिचे धक्कादायक उत्तर

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Apr 26, 2023 12:19 AM IST

chhatrapati sambhajinagar : मानलेली मुलगी असल्याचा बनाव निर्माण करत आपल्या घरात विद्यार्थिनीला राहण्यास जागा देऊन तिच्यावर विद्यापीठातील प्राध्यापकाने वारंवार बलात्कार केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

मानलेली मुलगी असल्याचा बनाव निर्माण करत आपल्या घरात विद्यार्थिनीला राहण्यास जागा देऊन तिच्यावर विद्यापीठातील प्राध्यापकाने वारंवार बलात्कार केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. धक्कादायक म्हणजे जेव्हा पीडित मुलीने या अत्याचाराची माहिती प्राध्यापकाच्या पत्नीला दिली तेव्हा तिनेही, तुझ्यापासून आम्हाला मुलगा हवाय, असे सांगत पतीच्या गुन्ह्यास पाठबळ दिले. या प्रकरणी बेगमपुरा पोलीस ठाण्यात मंगळवारी रात्री प्राध्यापकासह त्याच्या पत्नीविरोधात बलात्कारासह विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

प्रा. अशोक गुरप्पा बंडगर व पल्लवी अशोक बंडगर (दोन्ही रा. विद्युत कॉलनी बेगमपुरा छत्रपती) अशी आरोपींची नावे आहे. प्रा. अशोक बंडगर हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात नाट्यशास्त्र विभागात शिकवतो. तर ३० वर्षीय पीडिता फाईन आर्टच्या दुसर्‍या वर्षातील विद्यार्थिनी आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बुलढाणा जिल्ह्यातील पीडिता शिक्षणासाठी संभाजीनगरात रहात होती. विद्यापीठाच्या नाट्यशास्त्र विभागात प्रवेश घेतल्यानंतर पीडिता राहण्यासाठी घर शोधत होती. तिने प्राध्यापकाच्या ओळखीतून विद्युत कॉलनीत भाड्याने खोली बघण्याची विनंती केली होती. तेव्हा अशोक बंडगर याने मुलीला त्याच्या घरातच आश्रय दिला व यासाठी त्याच्या पत्नीचीही संमती असल्याचे सांगितले. विद्यार्थिनी आपल्याला मुलीसारखीच असल्याचे त्याने बोलून दाखवत विश्वास संपादन केला.

११ फेब्रुवारी २०२२ ते ११ फेब्रुवारी २०२३ या वर्षभरात विद्युत कॉलनीतील घरामध्ये जवळीक निर्माण करुन, छेडछाड करुन इच्छेविरुद्ध वेळोवेळी शिवीगाळ करून, धमकी देवून पीडितेसोबत प्रा. बंडगर याने शारीरिक संबंध ठेवले. त्याबाबत पीडितेने आरोपीची पत्नी पल्लवीकडे तक्रार केली. तेव्हा तिने सांगितले की, हे मला माहिती आहे व पतीचे कृत्य मान्य असल्याचे सांगून त्याला उत्तेजन दिले. आरोपीच्या पत्नीने पीडितेला सांगितले की, तुझ्यापासून आम्हास मुलगा हवा आहे. याप्रकरणी प्रा. अशोक बंडगर व पल्लवी बंडगर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

IPL_Entry_Point

विभाग