मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Unseasonal Rain : राज्यातील २५ जिल्ह्यांना अवकळीचा फटका; एक लाख ३९ हजार हेक्टरवरील पिकांची नासाडी

Unseasonal Rain : राज्यातील २५ जिल्ह्यांना अवकळीचा फटका; एक लाख ३९ हजार हेक्टरवरील पिकांची नासाडी

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Mar 21, 2023 12:49 PM IST

Unseasonal Rain : राज्यात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात झालेल्या अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तब्बल २५ जिल्ह्यांना या अवकाळी पावसाचा फटका बसला असून १ लाख ३९ हजार २२२ हेक्टरवरील पिकांचे नुकसान.

Unseasonal Rain
Unseasonal Rain

मुंबई : राज्याला मार्च महिन्यात अवकाळी पावसाचा मोठा तडाखा बसला. यात पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. रब्बी पीक आणि भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी हवाल दिल झाले आहे. या पिकांचे पंचनामे कधी होणार या विवंचनेत शेतकरी आहे. या महिन्यात झालेल्या पाऊस, गरपीट आणि वादळी वाऱ्याचा तब्बल १ लाख ३९ हजार २२२ हेक्टरवरील पिकांना फटका बसला आहे. या नुकसानीची भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांसह विरोधी पक्षाच्या नेत्यांनी केली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

राज्यात अवकाळी पावसाचा फटका शेतकऱ्यांना बसला. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होऊन पंचनामे केले गेले नसल्यामुळे विरोधी पक्षाने आक्रमक भूमिका घेत पंचनामे पूर्ण करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली. दरम्यान, राज्यात तब्बल १ लाख २२२ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. यात रब्बी पिके, भाजीपाला आणि फलभाज्यांना, तसेच फलबागांना फटका बसला. या क्षेत्रावरील बाधित शेतकऱ्यांचे पंचनामे केंद्र सरकारचे आपत्ती निवारण पथकाची मदत घेतली जाणार असल्याचे कृषि विभागाचे विकास आणि विस्तार विभागाचे संचालक विकास पाटील यांनी सांगितले.

अवकाळी पावसाचा राज्यातील २५ जिल्ह्यांना फटका बसला आहे. यात सर्वाधिक नुकसान झाले आहे ते नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक २३ हजार ८२१ हेक्टरवर नुकसान झाले आहे. त्याखालोखाल जालन्यात १५ हजार ०८० हेक्टर आणि नगर जिल्ह्यात १२ हजार १९८ हेक्टर, तर बीडमध्ये ११ हजार ३५६ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. लातूर जिल्ह्यात ११ हजार ७९५ हेक्टर, धुळय़ात ९०१७ हेक्टर, जळगावात ९ हजार ५२९ हेक्टरवर, ५ हजार ६०४ हेक्टर, नाशिकमध्ये ४ हजार २७५ हेक्टर, वाशिमध्ये ४ हजार ९८१ हेक्टर, बुलढाण्यात ३ हजार १४७ हेक्टर, पालघरमध्ये २ हजार ०१७ हेक्टर, नंदुरबारमध्ये १ हजार ८१४ हेक्टर, सोलापुरात ३ हजार ९७७ हेक्टरचे नुकसान झाले आहे.

‘येत्या दोन दिवसांत पंचनामे करू’

अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे केले जात आहेत. येत्या दोन दिवसांत ते काम पूर्ण करून शेतकऱ्यांना मदत जाहीर केली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी विधान परिषदेत केली. मदतीला होणाऱ्या विलंबावरून विधानसभेत विरोधकांनी सरकारला धारेवर धरत सभात्याग केला.

IPL_Entry_Point

विभाग