मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Uddhav Thackeray : मुंबईला दासी करण्याचा भाजपचा डाव; उद्धव ठाकरे शिंदे-फडणवीसांवर बरसले!

Uddhav Thackeray : मुंबईला दासी करण्याचा भाजपचा डाव; उद्धव ठाकरे शिंदे-फडणवीसांवर बरसले!

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Feb 19, 2023 07:31 PM IST

Uddhav Thackeray FB Live : आमच्यासोबत जे आज होतंय तेच उद्या तुमच्यासोबत होणार असल्याचं सांगत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भाजपवर आगपाखड केली आहे.

Uddhav Thackeray Speech Live Today
Uddhav Thackeray Speech Live Today (HT)

Uddhav Thackeray Speech Live Today : राज्यातील सत्तासंघर्षावरील सुनावणी सुप्रीम कोर्टात सुरू असतानाच निवडणूक आयोगानं शिवसेनेचं नाव आणि चिन्ह शिंदे गटाला बहाल केलं आहे. त्यामुळं आता त्यावरून ठाकरे आणि शिंदे गटामध्ये जोरदार राजकीय संघर्ष पेटलेला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पुण्यातील कार्यक्रमात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हद्वारे भाजपच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं आहे. मुंबईला दासी बनवण्याचा भाजपचा डाव असून प्रत्येक गोष्टीसाठी आपण भिकाऱ्यासारखं दारात उभं राहिलं पाहिजे, असं त्यांना वाटत आहे, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी मोदी-शहांवर जोरदार टिकास्त्र सोडलं आहे.

ट्रेंडिंग न्यूज

उत्तर भारतीयांच्या कार्यक्रमात बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, माझ्या पक्षातलेच लोक दुसरीकडे गेले होते. ते मला माझ्याच घरातून बाहेर काढू पाहत आहेत. निवडणूक आयोगाच्या निकालानंतर त्यांना माझ्या घराचंही मालक व्हायचं आहे, असं म्हणत ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. याशिवाय आमच्यासोबत जे आज घडतंय ते उद्या तुमच्यासोबतही घडणार असल्याचं म्हणत ठाकरेंनी भाजपला टोला हाणला आहे. यांना भाजपला बाळासाहेबांचा चेहरा पाहिजे आहे, पण त्यांचा मुलगा नकोय, असंही ठाकरे म्हणालेत.

जगातला सर्वात बलवान आणि शक्तिशाली पंतप्रधान सत्तेवर असताना हिंदूंना जनआक्रोश मोर्चा का काढावा लागतो?, देशात राहणारा प्रत्येक व्यक्ती हा आमचा बांधव आहे. हिंदू, मुस्लिम असेल किंवा उत्तर भारतीय हे सर्वजण आमचे बांधव आहेत, हेच आमचं हिंदुत्व आहे. त्यामुळं भाजप आणि शिंदे गटानं किती आरोप केले तरी आगामी निवडणुकीत त्यांना शिवसैनिक चांगल्याच पद्धतीनं धडा शिकवणार असल्याचंही उद्धव ठाकरे म्हणाले.

IPL_Entry_Point