मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Modi in Mumbai : मुंबईत पोस्टर वॉर! बाळासाहेबांना वाकून नमस्कार करतानाचे पीएम मोदींचे फोटो झळकले

Modi in Mumbai : मुंबईत पोस्टर वॉर! बाळासाहेबांना वाकून नमस्कार करतानाचे पीएम मोदींचे फोटो झळकले

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Jan 19, 2023 12:11 PM IST

PM Modi In Mumbai : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज मुंबई दौऱ्यावर येत आहे. कोट्यवधी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन मोदी यांच्या हस्ते होणार आहे. मात्र, या दौऱ्यावरून आता राजकारण रंगू लागले आहे.

PM Modi Visit Mumbai
PM Modi Visit Mumbai

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज मुंबई दौऱ्यावर आहेत. त्यांच्या हस्ते आज अनेक प्रकल्पांचे उद्घघाटन केले जाणार आहेत. येणाऱ्या महानगर पालिकेच्या निवडणुकच्या पार्श्वभूमीवर हा दौरा होत असल्याची टीका शिवसेना उद्धव ठाकरे गटाने केला आहे. तसेच ही विकास कामे आमच्या काळातील आहे, असे संजय राऊत म्हणाले होते. सत्तांतरानंतर मोदी मुंबईत पाहिल्यांदा येत आहेत. ही विकास कामे सत्तांतरानानंतरची आहेत असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना उत्तर दिले आहे. त्यानंतर आता मुंबईत पोस्टर वॉर रंगले आहे. गिरगाव येथे बाळासाहेब ठाकरे यांचा हात पकडून मोदी हे वाकून नमस्कार करत असल्याचे पोस्टर सगळीकडे लावण्यात आले आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज हे मुंबई दौऱ्यावर असून त्यांच्या हस्ते विविध प्रकल्पांचे उद्घघाटन होणार आहे. मोदी यांच्या हस्ते मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) आणि मुंबई महापालिकेच्या विविध प्रकल्पांचे लोकार्पण; तसेच भूमिपूजन त्यांच्या हस्ते होणार आहे. त्यांच्या दौऱ्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. मुंबई निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिंदे गटाने या दौऱ्याची जय्यत तयारी केली आहे. शिंदे गट आणि भाजपचे कार्यकर्ते बीकेसी मैदानावर होणाऱ्या मोदी यांच्या सभेसाठी व्यस्त आहेत. तसेच उद्धव ठाकरे गटावरही यावरुन निशाणा साधला जात आहे. याला उत्तर म्हणून ठाकरे गटाने गिरगाव येथे पोस्टर बाजी केली आहे.

गिरगाव येथे पंतप्रधान नरेंद मोदी आणि बाळासाहेब ठाकरे यांचे पोस्टर लावण्यात आले आहेत. या पोस्टरमध्ये मोदी हे बाळासाहेब ठाकरे यांचा हात पकडून त्यांना नमस्कार करतांना दिसत आहे. यातून ठाकरे गट भाजप-शिंदे गटाला जुन्या गोष्टींची आठवण करून दिली आहे.

 

IPL_Entry_Point