मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Sharad Pawar : राष्ट्रवादीतील भूकंपाचे हादरे दिल्ली-चेन्नईपर्यंत; राहुल गांधी, स्टॅलिन यांचा सुप्रिया सुळेंना फोन

Sharad Pawar : राष्ट्रवादीतील भूकंपाचे हादरे दिल्ली-चेन्नईपर्यंत; राहुल गांधी, स्टॅलिन यांचा सुप्रिया सुळेंना फोन

Atik Sikandar Shaikh HT Marathi
May 04, 2023 05:19 PM IST

MK Stalin News Today : मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याला फोन केल्याची माहिती समोर आली आहे.

MK Stalin Calls Supriya Sule
MK Stalin Calls Supriya Sule (HT)

MK Stalin Calls Supriya Sule : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देत राजकारणातून निवृत्ती घेण्याची घोषणा केली आहे. त्यामुळं आता महाराष्ट्रासह देशभरात राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्त्यांनी शरद पवारांना राजीनाम्याचा निर्णय मागे घेण्याची विनंती केली आहे. त्यानंतर आता कार्यकर्त्यांच्या भावनांकडे दुर्लक्ष केलं जाणार नसल्याचं सांगत शरद पवारांनी निवृत्तीच्या निर्णयावर फेरविचार करण्याचे संकेत दिले आहे. त्यानंतर आता तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन आणि राहुल गांधी यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना फोन केल्याची माहिती समोर आली आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राजकारणातून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर मुख्यमंत्री एमके स्टॅलिन आणि राहुल गांधी यांनी खासदार सुप्रिया सुळे यांना फोन केला आहे. दोन्ही नेत्यांनी शरद पवारांनी घेतलेल्या निर्णयावर फेरविचार करण्याची मागणी केली आहे. त्यामुळं आता राहुल गांधी आणि मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांची भावना सुप्रिया सुळे खासदार शरद पवार यांच्यापर्यंत पोहचवणार आहे. त्यामुळं आता दिल्ली आणि चेन्नईतील दोन बड्या नेत्यांच्या विनंतीमुळं शरद पवार राजीनाम्याचा निर्णय मागे घेणार की नाही, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Caste Census Bihar : बिहारमधील जातनिहाय जनगणना तात्काळ थांबवा, पाटणा हायकोर्टाचे आदेश

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राजकारणातून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर राष्ट्रवादीचे अनेक नेते आणि कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त करत पवारांना निर्णय मागे घेण्याची विनंती केली होती. त्यानंतर आता कार्यकर्त्यांच्या भावनांकडे दुर्लक्ष केलं जाणार नाही, असं म्हणत शरद पवारांनी राजीनामा मागे घेण्याचे संकेत दिले आहे. याशिवाय येत्या दोन ते तीन दिवसांत निवृत्तीबाबतचा अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याचंही शरद पवारांनी स्पष्ट केलं आहे.

IPL_Entry_Point