मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune Crime : पुण्यात क्रोर्याची परिसीमा! पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत गुप्तांगाला दिले हिटरचे चटके

Pune Crime : पुण्यात क्रोर्याची परिसीमा! पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत गुप्तांगाला दिले हिटरचे चटके

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
May 03, 2023 09:31 PM IST

Pune Crime : पुण्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका पतीने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिच्या गुप्तांगाला हिटरने चटके दिले. ही घटना कोंढवा परिसरात घडली.

Pune Crime
Pune Crime

पुणे : पुण्यात पती आणि पत्नीच्या नात्याला काळिमा फसणारी घटना उघडकीस आली आहे. एका पतीने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला नग्न करत तिच्या गुप्तांगाला हिटरने चटके दिले. नराधम पती एवढ्यावरच नाही थांबला तर भाजलेल्या जागेवर तेल ओतत तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तसेच तिच्या गुप्तांगात दगडी बत्ता घालण्याचा प्रयत्न करून तिच्या तोंडात लघवी करत क्रोर्याची परिसीमा गाठली. हाच प्रकार मुलीसोबत करण्याची धमकी पतीने दिल्यावर पत्नीने पोलिसांत धाव घेत तक्रार दिली. या प्रकरणी कोंढवा पोलिसांनी ४० वर्षीय आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

Mangesh Satamkar: ठाकरेंच्या शिवसेनेला मुंबईत धक्का! माजी नगरसेवक मंगेश सातमकर यांच्यावर बलात्कार प्रकरणी गुन्हा

पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार या प्रकरणी एका ३५ वर्षीय पीडितेने तक्रार दिली आहे. त्यानुसार कोंढवा पोलिसांनी पतीवर गुन्हा दाखल केला आहे. आरोपी हा महिलेचा पती आहे. त्याने ३० एप्रिल रोजी संबंधित पीडित महिलेच्या हातात मुलीचा मोबाईल पहिला. यावरून त्याला राग आल्याने 'तू कोणाबरोबर बोलत तर नाहीत ना' म्हणून तिच्या हाताला जोरात ओढून तिला बेडरूममध्ये जबरदस्तीने नेत कडी आतून लावून घेतली.

Maharashtra Weather: मराठवाडा, विदर्भात पुढील २४ तास महत्वाचे; गारपीटीसह, वादळी वारा अन् पावसाचा इशारा

यावेळी महिलेची चार मुले घरीच होती. ती भहेरून ओरडत होती. मात्र, आरोपीने दरवाजा न उघडता तिचे हात पाय बांधून तिच्या गुप्तांगाला हिटरने चटके दिले. तिला भाजून गंभीर जखम झाली असतांना देखील त्याने कुठलाही विचार न करता तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. यानंतरही त्याचे समाधान झाले नाही. त्याने तिच्या गुप्तांगात दगडी बत्ता घालण्याच्या प्रयत्न केला.

यानंतर त्याने पीडित महिलेच्या तोंडात लघवी करत 'तुला खूप माज आला आहे, तुझा माज उतरवतो 'म्हणून शिवीगाळ करत तसेच तिच्या डोक्यात, हातापायावर खलबत्त्याने मारहाण केली. बाहेरून मुले ओरडत असल्याने त्याने दरवाजा उघडला. मुले आत आल्यावर आईच्या रडण्याने भेदरली. यावेळी आरोपी बापाने ही माझी मुले नाहीत म्हणत मुलीसोबत देखील असाच प्रकार करू अशी धमकी दिली. दरम्यान, पीडिता ही गंभीर जखमी झाल्याने तिने आधी दवाखान्यात उपचार घेतले. यानंतर कोंढवा पोलिस ठाणे गाठत तक्रार दाखल केली. कोंढवा पोलिसांनी आरोपीला अटक केली असून गुन्हा दाखल केला आहे.

IPL_Entry_Point

विभाग