मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mangesh Satamkar: ठाकरेंच्या शिवसेनेला मुंबईत धक्का! माजी नगरसेवक मंगेश सातमकर यांच्यावर बलात्कार प्रकरणी गुन्हा

Mangesh Satamkar: ठाकरेंच्या शिवसेनेला मुंबईत धक्का! माजी नगरसेवक मंगेश सातमकर यांच्यावर बलात्कार प्रकरणी गुन्हा

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
May 03, 2023 10:20 AM IST

FIR Against Mangesh Satamkar : उद्धव ठाकरे गटाचे नेते तसेच माजी नगरसेवक मंगेश सातमकर यांच्यावर एका तरुणीने बलात्काराचा आरोप केला आहे. या प्रकरणी खातमकर यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

FIR Against Mangesh Satamkar
FIR Against Mangesh Satamkar

मुंबई : उद्धव ठाकरे गटाचे माजी नगरसेवक मंगेश सातमकर यांच्यावर एका तरुणीने गंभीर आरोप केले आहे. सातमकर यांनी तरुणीवर बलात्कार केल्याचा आरोप केला असून या प्रकरणी वडाळा टीटी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार त्यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Maharashtra Weather: मराठवाडा, विदर्भात पुढील २४ तास महत्वाचे; गारपीटीसह, वादळी वारा अन् पावसाचा इशारा

उद्धव ठाकरे गटाचे माजी नगरसेवक मंगेश सातमकर यांच्यावर २९ वर्षीय तरुणीने खळबळजनक आरोप केले आहे. वडाळा टीटी पोलीस ठाण्यात सातमकर यांच्याविरुद्ध लैंगिक छळाची लेखी तक्रार या तरुणीने दाखल केली आहे. पीडित मुलगी ही मंगेश सातमकर यांचे सोशल मीडिया आणि जनसंपर्काचे काम पाहते. दरम्यान, सातमक यांनी या तरुणीवर लैंगिक छळ केला केल्याचा आरोप केला आहे.

Rahul Gandhi: राहुल गांधी पुन्हा अडचणीत; सावरकरांबाबत केलेल्या आक्षेपार्ह व्यक्तव्या प्रकरणी चौकशीचे आदेश

लग्नाचे आमिष दाखवून अनेकदा बलात्कार केल्याचा आरोप या तरुणीने केला आहे. त्यानुसार खातमकर यांच्यावर अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

खातमकर हे उद्धव ठाकरे गटाचे नेते आहे. ते माजी नगरसेवक देखील राहिले आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे. यामुळे उद्धव ठाकरे गटाच्या अडचणी वाढल्या आहेत.

IPL_Entry_Point

विभाग