मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Rahul Gandhi: राहुल गांधी पुन्हा अडचणीत; सावरकरांबाबत केलेल्या आक्षेपार्ह व्यक्तव्या प्रकरणी चौकशीचे आदेश

Rahul Gandhi: राहुल गांधी पुन्हा अडचणीत; सावरकरांबाबत केलेल्या आक्षेपार्ह व्यक्तव्या प्रकरणी चौकशीचे आदेश

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
May 03, 2023 09:17 AM IST

Savarkar Remarks Row: राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी यांच्या बाबत केलेल्या आक्षेपार्ह वर्तनाप्रकरणी न्यायालयाने त्यांना दोषी ठरवल्याने त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली होती. आता पुन्हा एका प्रकरणात गांधी यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

Rahul Gandhi
Rahul Gandhi

दिल्ली : कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. आधी गुजरात येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी कोर्टाने दोषी ठरवल्याने राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली होती. दरम्यान, हे प्रकरण ताजे असतांना त्यांनी केलेल्या आणखी एका आक्षेपार्ह व्यक्तव्या बाबत न्यायालयाने त्यांची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

Pune Crime : धक्कादायक ! प्रियकराच्या त्रासामुळे तरुणीची आत्महत्या, प्रियकरासह दोघांच्या विरुद्ध गुन्हा

राहुल गांधी यांनी विनायक दामोदर सावरकर यांच्यावर केलेल्या कथित आक्षेपार्ह वक्तव्या केल्याने या विरोधात त्यांची चौकशी करण्यात यावी अशी तक्रार न्यायालयात दाखल करण्यात आली होती. या तक्रारीची दाखल न्यायालयाने घेत तयाची चौकशी करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

उत्तर प्रदेशातील लखनौ येथील न्यायालयानं मंगळवारी राहुल गांधी यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा काढली होती. या यात्रे दरम्यान राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. या विरोधात गांधी यांच्याबाबत तक्रार दाखल करण्यात आली होती.

Maharashtra Weather: मराठवाडा, विदर्भात पुढील २४ तास महत्वाचे; गारपीटीसह, वादळी वारा अन् पावसाचा इशारा

दरम्यान, या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश लखनौ न्यायालयाने मंगळवारी दिले. अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी अंबरीश कुमार श्रीवास्तव यांनी सीआरपीसीच्या कलम १५६ (३ ) अंतर्गत अधिवक्ता नृपेंद्र पांडे यांनी दाखल केलेल्या अर्जावर राहुल गांधी यांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. दरम्यान हजरतगंज पोलीस ठाण्याला या प्रकरणाचा तपास निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याच्या वतीनं करण्याचे निर्देश दिले. या प्रकरणाची पुढील सुनावणी २ जून रोजी होणार आहे.

राहुल गांधी यांनी हीन भावना पसरवण्यासाठी असभ्य शब्द वापरून वीर सावरकरांचा अपमान केला आणि द्वेषपूर्ण वक्तव्य केले असे, पांडे यांनी आपल्या याचिकेत म्हटले आहे. १७ नोव्हेंबर रोजी समाजात द्वेष पसरवण्याच्या उद्देशानं राहुल गांधी यांनी विनायक दामोदर सावरकर यांना ब्रिटीशांचे सेवक म्हटलं आणि त्यांनी इंग्रजांकडून पेन्शन घेतली, असे राहुल गांधी यांनी म्हटले होते.

IPL_Entry_Point

विभाग