मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Shrikant Shinde: दोन टर्मचा खासदार आहे, कुठं बसायचं ते कळतं; 'त्या' फोटोवरून श्रीकांत शिंदे भडकले!

Shrikant Shinde: दोन टर्मचा खासदार आहे, कुठं बसायचं ते कळतं; 'त्या' फोटोवरून श्रीकांत शिंदे भडकले!

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Sep 23, 2022 03:55 PM IST

Shrikant Shinde: मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव 'सुपर सीएम' बनून राज्याचा कारभार हाकत असल्याच्या विरोधकांच्या आरोपांना श्रीकांत शिंदे यांनी जोरदार उत्तर दिलं आहे.

Shrikant Shinde
Shrikant Shinde

Shrikant Shinde in CM Chair: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीत असताना त्यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे प्रति मुख्यमंत्री बनून कारभार हाकत असल्याचा एक फोटो राष्ट्रवादी काँग्रेसनं शेअर केले होते. त्यामुळं राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चेला उधाण आलं होतं. श्रीकांत शिंदे यांनी तात्काळ पत्रकार परिषद घेऊन यावर खुलासा केला आहे. ‘मी दोन टर्मचा खासदार आहे. कुठं बसायचं हे मला चांगलं माहीत आहे,’ असं त्यांनी विरोधकांना सुनावलं आहे.

श्रीकांत शिंदे यांनी हे फोटो व्हायरल झाल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. 'राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सक्षम आहेत. १८ ते २० काम करत आहे. त्यांचा कारभार दुसऱ्या कोणीही सांभाळण्याची गरज नाही, असं त्यांनी म्हटलं आहे.

‘माझ्या ज्या कार्यालयाचा फोटो सध्या व्हायरल होतोय, ते कार्यालय आमच्या घरातलं आहे. आम्ही दोघंही तिथं बसून लोकांना भेटत असतो. त्यांच्या समस्या सोडवत असतो. शिंदे साहेब मुख्यमंत्री होण्याच्या आधीपासून लोक तिथं येत असतात. हे शासकीय घर नाही. मी मंत्रालय किंवा वर्षा बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसलोय असं झालेलं नाही. व्हायरल झालेल्या फोटोमध्ये माझ्या मागे जो 'मुख्यमंत्री’ नावाचा बोर्ड आहे, तो मूव्हेबल बोर्ड आहे. तो कुठेही ठेवता येतो. मुख्यमंत्री साहेब शक्य होईल, तिथून काम करत असतात. त्यामुळं तो बोर्ड सोबत असतो. लवकरच मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद होणार होती, त्यासाठी तो बोर्ड कर्मचाऱ्यांनी इथं आणला असावा. तो बोर्ड माझ्या मागे आहे हे माझ्या ध्यानीमनीही नव्हतं. मात्र, फोटो काढणाऱ्यानं हुशारीनं माझा त्याच्याशी संबंध जोडला, असं श्रीकांत शिंदे म्हणाले.

ठाकरे पिता-पुत्रांना श्रीकांत शिंदे यांचा टोला

'आमच्या घराच्या बाहेर देखील मुख्यमंत्री असा बोर्ड लावलाय. उद्या मी तिथं उभा राहिलो तर त्यातूनही काही अर्थ काढला जाईल. अनावधानानं एखादी गोष्ट होत असेल, तर त्यातून काहीतरी वेगळी चर्चा घडवून आणायची हे चुकीचं नाही. विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरली आहे याचं हे द्योतक आहे. या आधीचा त्यांचा अनुभव वेगळा असू शकतो, असं म्हणत, श्रीकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांनाही टोला हाणला.

IPL_Entry_Point

विभाग