मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Sanjay Raut : देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिताच संजय राऊत यांच्या सुरक्षेत वाढ

Sanjay Raut : देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिताच संजय राऊत यांच्या सुरक्षेत वाढ

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Feb 22, 2023 11:01 AM IST

Sanjay Raut Security : आपल्यावर हल्ल्याची सुपारी दिल्याच्या संजय राऊत यांच्या आरोपांनंतर त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

Sanjay Raut
Sanjay Raut (HT_PRINT)

Sanjay Raut Security : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे यांनी माझ्यावर हल्ला करण्याची सुपारी एका टोळीला दिलीय, असा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला होता. देवेंद्र फडणवीस यांना राऊत यांनी तसं पत्र लिहिलं होतं. त्यानंतर राऊत यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार जाऊन शिंदे सरकार सत्तेत आल्यानंतर महाविकास आघाडीच्या काही नेत्यांच्या सुरक्षेत कपात करण्यात आली होती. त्यात संजय राऊत हेही होते. मात्र, आता त्यांना पुन्हा सुरक्षा देण्यात आली आहे. मुंबई पोलीस आयुक्त व गृहमंत्री फडणवीस यांना लिहिलेलं पत्र त्यासाठी कारणीभूत ठरलं आहे.

संजय राऊत हे ठाकरे गटाचे एक आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात. विरोधकांवर ते सातत्यानं टीका करत असतात. केंद्रातील मोदी सरकारचे चुकीचे निर्णय, तपास यंत्रणांचा होणारा गैरवापर यांवर ते बेधडक मत मांडतात. शिंदे सरकार आल्यापासून त्यांनी या सरकारलाही घेरलं आहे. त्यामुळं तेही त्यांच्या विरोधकांच्या रडारवर असतात. त्यातच आता त्यांनी जिवाला धोकाचा असल्याचा दावा केला आहे. हा आरोप करताना त्यांनी थेट एकनाथ शिंदे यांच्या मुलाचं नाव घेतल्यानं ही बाब राज्य सरकारनं गांभीर्यानं घेतली आहे.

राऊत आज नाशिकमध्ये आहेत. तिथं पोलीस त्यांच्या दिमतीला आले आहेत. मात्र, सुरक्षा मिळावी यासाठी मी आरोप केलेला नाही, असं राऊत यांनी स्पष्ट केलं आहे.

काय होतं संजय राऊत यांच्या पत्रात? 

'गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधींना धमक्या देण्याचं व हल्ले करण्याचं प्रमाण वाढलं आहे. ही महाराष्ट्राची परंपरा नाही. महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यानंतर माझी सर्व सुरक्षा व्यवस्था हटविण्यात आली, माझी त्याबद्दल तक्रार नाही. असे राजकीय निर्णय होत असतात. लोकप्रतिनिधींची सुरक्षा हा सरकारचा विषय आहे व गृहमंत्री म्हणून आपण त्याबाबत सक्षम आहात, तरीही एक गंभीर बाब मी आपल्या निदर्शनास आणू इच्छितो. ठाण्यातील एक कुख्यात गुंड राजा ठाकूर व त्याच्या टोळीस माझ्यावर हल्ला करण्याची सुपारी खासदार श्रीकांत शिंदे यांच्याकडून देण्यात आल्याची माहिती मला मिळाली आहे. सध्या महाराष्ट्रातील वातावरण पाहता हा विषय आपल्या निदर्शनास आणणं आवश्यक आहे.

IPL_Entry_Point

विभाग