मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Sanjay Raut: शिवसेनेचे चिन्ह आणि नाव मिळवण्यासाठी २००० कोटींचा व्यवहार; संजय राऊतांचा हल्लाबोल

Sanjay Raut: शिवसेनेचे चिन्ह आणि नाव मिळवण्यासाठी २००० कोटींचा व्यवहार; संजय राऊतांचा हल्लाबोल

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Feb 19, 2023 10:49 AM IST

Sanjay Raut Shiv Sena name And symbol: केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचे चिन्ह आणि नाव शिंदे गटाला दिल्याने खासदार संजय राऊत आक्रमक भूमिकेत दिसत आहेत.

Senior Shiv Sena leader Sanjay Raut. (PTI Photo)
Senior Shiv Sena leader Sanjay Raut. (PTI Photo) (HT_PRINT)

Maharashtra Politics: केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना हा पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे यांना दिल्यानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मोठी कोंडी झाली. गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेचे एकहाती नेतृत्व करणाऱ्या उद्धव यांच्यावर आधी आमदार आणि आता पक्षही गमावण्याची नामुष्की ओढावली. दरम्यान, निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णायावरून खासदार संजय राऊत यांनी आक्रमक भूमिका घेत भाजप आणि शिंदे गटावर हल्लाबोल केला आहे. शिवसेनेचे चिन्ह आणि नाव मिळवण्यासाठी २००० कोटींचा व्यवहार झाल्याचा आरोप संजय राऊतांनी केला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

नुकतेच संजय राऊत यांनी एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये संजय राऊतांनी विरोधकांना बोट दाखवले आहे. "माझी खात्रीची माहिती आहे...चिन्ह आणि नाव मिळवण्यासाठी आता पर्यंत २००० कोटींचा सौदा आणि व्यवहार झाले आहेत...हा प्राथमिक आकडा आहे आणि १०० टक्के सत्य आहे... बऱ्याच गोष्टी लवकरच उघड होतील..देशाच्या इतिहासात असे कधीच घडले नव्हते..." आशा आशयाचे संजय राऊतांनी ट्वीट केले आहे.

पुढच्या दोन ते तीन महिन्यांत राज्यात महापालिका आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. त्या अगोदर शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह मिळाल्यानं मोठा दिलासा मिळाला आहे. पक्षचिन्हासोबतच शिवसेना नावदेखील एकनाथ शिंदे यांच्या गटाला मिळाले आहे. यापूर्वी निवडणूक आयोगानं हंगामी निर्णय देताना दोन्ही गटांना वेगवेगळे चिन्ह दिले होते. अंधेरी पोटनिवडणुकीत ठाकरे गटाला धगधगती मशाल आणि शिंदे गटाला ढाल हे चिन्ह देण्यात आले.

IPL_Entry_Point

विभाग