मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Subhash Desai: मुलगा भूषण देसाई यांच्या शिंदे गटातील प्रवेशावर सुभाष देसाई स्पष्टच बोलले

Subhash Desai: मुलगा भूषण देसाई यांच्या शिंदे गटातील प्रवेशावर सुभाष देसाई स्पष्टच बोलले

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Mar 13, 2023 08:41 PM IST

Subhash Desai On Bhushan Desai: मुलगा भूषण देसाई यांच्या शिंदे गटातील प्रवेशावर ठाकरे गटाचे जेष्ठ नेते सुभाष देसाई यांनी आपली प्रतिक्रिया दिली.

Subhash Desai On Bhushan Desai
Subhash Desai On Bhushan Desai

Subhash Desai On Bhushan Desai: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय सुभाष देसाई यांचे पुत्र भूषण देसाई यांनी आज शिंदे गटात प्रवेश केला आहे. भूषण देसाई यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यामुळे देसाई कुटुंबात फूट पडल्याची चर्चा सरु झाली आहे. भूषण देसाई यांच्या निर्णयामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात ठिणगी पडली आहे. दरम्यान, मुलगा भूषण देसाई यांच्या शिंदे गटातील प्रवेशावर सुभाष देसाई यांनी आपली स्पष्ट प्रतिक्रिया दिली आहे. भूषण देसाईच्या कुठल्याही पक्षात जाण्याने ठाकरे गटावर कोणताही परिणाम होणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

सुभाष देसाई म्हणाले की,"माझा मुलगा भूषण देसाईने आज शिंदे गटात प्रवेश केला, ही घटना माझ्यासाठी क्लेशदायक आहे. त्याचे शिवसेनेत किंवा राजकारणात कोणतेच काम नाही. त्यामुळे त्याच्या कुठल्याही पक्षात जाण्याने शिवसेनेवर अर्थात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षावर कोणताही परिणाम होणार नाही. शिवसेना, वंदनीय बाळासाहेब, उद्धवसाहेब आणि मातोश्रीशी मागील पाच दशकांहून अधिक काळापासून असलेली माझी निष्ठा तशीच अढळ राहील. वयाच्या या टप्प्यावर मी खूप काही करण्याची घोषणा करणार नाही. मात्र, इथून पुढेसुद्धा संपूर्ण न्याय मिळेपर्यंत आणि शिवसेनेचे गतवैभव परत मिळेपर्यंत मी असंख्य शिवसैनिकांच्या सोबतीने माझे कार्य सुरु ठेवणार आहे."

"भूषण देसाई यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. सध्या राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेधन सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर सुभाष देसाई आमच्या पक्षात सामील झाले आहेत. आमचं सरकार हिंदुहृदयसम्राट बाळासाहेबांच्या विचारांवर चालणारे सरकार आहे. अनेक पक्षातील नेते आमच्यासोबत येत आहेत", असेही एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय.

IPL_Entry_Point

विभाग