मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Nagpur school girl rape: स्कूल बसच्या ड्रायव्हरचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार; नागपुरात खळबळ

Nagpur school girl rape: स्कूल बसच्या ड्रायव्हरचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार; नागपुरात खळबळ

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Nov 08, 2022 03:24 PM IST

Nagpur school girl rape: आरोपी पवनने अल्पवयीन मुलीला झोपडीत नेऊन तिचा बलात्कार करत फोटो काढले. घडलेल्या प्रकाराबाबत कुणाला सांगितल्यास फोटो व्हायरल करण्याची धमकीही दिली.

Rape Case In Nagpur
Rape Case In Nagpur (HT)

School van driver rapes Nagpur girl: स्कूल बस चालकानं एका अल्पवयीन मुलीला झोपडीत नेऊन बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळं नागपूरात खळबळ उडाली असून या प्रकरणात पोलिसांनी आरोपी ड्रायव्हरला अटक केली असून त्याच्याविरुद्ध अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीनं अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्यानंतर मुलीचे अश्लिल फोटो काढून तिला ब्लॅकमेल केलं होतं. त्यानंतर तब्बल तीन आठवड्यानंतर प्रकरणाचा भांडाफोड झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तीन आठवड्यांपूर्वी नागपूर शहरातील कोराडी परिसरातून पीडित अल्पवयीन तरुणी एका स्कूल बसमध्ये बसून शाळेत ये-जा करत होती. त्यावेळी आरोपी पवन कोहपरे (२६) यानं स्कूल बसमधील इतर विद्यार्थींनींना दुसऱ्या एका स्कूल बसमध्ये बसवून शाळेत पाठवलं आणि अल्पवयीन मुलीला शहरातील अज्ञातस्थळी एका झोपडीत नेवून तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर आरोपीनं मुलीला शाळेत नेलं आणि वेळेवर घरीही आणून सोडलं. परंतु आरोपीनं मुलीचे अश्लिल फोटो काढून घटनेबाबत कुणाला माहिती दिल्यास फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. त्यामुळं पीडित मुलीनं तीन आठवडे घडलेल्या प्रकाराबाबत कुणालाही सांगितलं नाही.

परंतु गेल्या काही दिवसांपासून आरोपी पवन हा पीडित अल्पवयीन मुलीला शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी करत होता. त्यामुळं आरोपीच्या मागणीला कंटाळून पीडितेनं आतापर्यंत घडलेला सर्व प्रकार तिच्या आई-वडिलांना सांगितला. त्यानंतर मुलीच्या पालकांनी याबाबतची तक्रार शहरातील कोराडी पोलीस ठाण्यात दिली. त्यानंतर पोलिसांनी मुलीचा जबाब नोंदवल्यानंतर आरोपी पवनला अटक केली असून त्याच्याविरोधाधात अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

IPL_Entry_Point

विभाग