Bharat Jodo Yatra In Maharashtra : केरळ, तामिळनाडू, कर्नाटक आणि तेलंगणानंतर आता भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात दाखल झाली आहे. राहुल गांधींसह कॉंग्रेसच्या असंख्य कार्यकर्त्यांनी मशाल हाती घेत नांदेड जिल्ह्यातल्या देगलूरमध्ये प्रवेश केला. यावेळी राहुल गांधींनी देगलूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला वंदन करत राज्यातील यात्रेला सुरुवात केली आहे.