मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Sunil Raut : ‘कोणत्याही वकिलाला विचारा, चार्जशीट घेऊन जा, राऊतांनी रुपयाचाही घोटाळा केला नाही’

Sunil Raut : ‘कोणत्याही वकिलाला विचारा, चार्जशीट घेऊन जा, राऊतांनी रुपयाचाही घोटाळा केला नाही’

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Oct 11, 2022 11:17 AM IST

Patra Chawl Corruption Case : पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणात शिवसेनेचे खासदार संजय राऊतांच्या कोठडीत पुन्हा वाढ करण्यात आली आहे.

Patra Chawl Corruption Case
Patra Chawl Corruption Case (Anshuman Poyrekar/HT PHOTO)

Patra Chawl Corruption Case : मुंबईच्या गोरेगावातील पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी कोर्टानं शिवसेनेचे खासदार संजय राऊतांना कोर्टानं पुन्हा कोठडी सुनावली आहे. त्यामुळं राऊतांच्या अडचणी वाढल्या आहेत. परंतु आता त्यांच्या कोठडीवरून त्यांचे बंधू सुनिल राऊत यांनी भाजप आणि तपास यंत्रणांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

माध्यमांशी बोलताना सुनिल राऊत म्हणाले की, संजय राऊतांनी कधीही एक रुपयाचाही घोटाळा केलेला नाही. त्यांची काहीही चूक नाहीये. देशातल्या कोणत्याही वकिलाला विचारा, माझ्याकडून चार्जशीट घेऊन जा, त्यात त्यांच्यावर एफआयआरच होऊ शकत नाही. परंतु जोपर्यंत देशात भाजपचं राज्य आहे, तोपर्यंत काहीही होऊ शकतं, असं म्हणत सुनिल राऊतांनी भाजपवर निशाणा साधला आहे. मुंबईतील विक्रोळीतील एका कार्यक्रमात ते बोलत होते.

कितीही अन्याय करू देत, संजय राऊत बाहेर येणार...

संजय राऊतांनी भाजपच्या अत्याचाराविरोधात नेहमीच आवाज बुलंद केलेला आहे. त्यांच्यावर कितीही अन्याय झाला तरी ते शंभर टक्के बाहेर येतील, असंही सुनिल राऊत म्हणालेत. जेव्हा ते तुरुंगात जात होते तेव्हा त्यांच्या कानात एकानं भाजपशी कॉम्प्रमाइज करण्याचा सल्ला दिला. परंतु त्यांनी त्याला तिथंच मी बाळासाहेबांना वरती जाऊन काय तोंड दाखवणार? गद्दार म्हणून की निष्ठावंत शिवसैनिक म्हणून?, अशा शब्दांत सुनावल्याचा खुलासाही सुनिल राऊतांनी केला.

एकनाथ शिंदे हे बिनपक्षाचे मुख्यमंत्री- सुनिल राऊत

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हाताखाली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना काम करावं लागत आहे. शिंदे हे बिनपक्षाचे मुख्यमंत्री असून भाजप त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन शिवसेना संपवत असल्याचाही आरोप त्यांनी शिंदेंवर केला आहे.

IPL_Entry_Point