मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Sangli Accident : सांगली विटा रस्त्यावर भरधाव कार ट्रॅव्हल्सला धडकली; एकाच कुटुंबातील ४ जण जागीच ठार

Sangli Accident : सांगली विटा रस्त्यावर भरधाव कार ट्रॅव्हल्सला धडकली; एकाच कुटुंबातील ४ जण जागीच ठार

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
May 04, 2023 12:42 PM IST

Sangli Accident : सांगली-विटा रस्त्यावर आज सकाळी ७ वाजता भीषण अपघात झाला. भरधावर कार ट्रॅव्हल्सला धडकल्याने एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच मृत्यू झाला आहे.

Two Wheeler Accident Kandhar Nanded
Two Wheeler Accident Kandhar Nanded (HT)

सांगली : सांगलीच्या विटाजवळ आज सकाळी ७ च्या समरस खाजगी ट्रॅव्हल्स आणि कारची समोरासमोर भीषण धडक झाली. या अपघातात एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात कारचा चक्काचूर झाला. सुदैवाने गाडीत असणारी एअर बॅग वेळीच उघडल्याने गाडीतील एक व्यक्ती बचावला. अपघातानंतर या मार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

Cyclone Mocha : 'मोचा' चक्रीवादळ धडकणार! बंगाल, ओडिशाला हवामान विभागाचा हायअलर्ट

विटा येथील सातारा मार्गावर शिवाजीनगर परिसरात हा अपघात घडला. मृतांमध्ये एक महिला आणि तीन पुरुषांचा समावेश आहे. हे सर्व तासगाव तालुक्यातल्या गव्हाण येथील असल्याची माहिती आहे.

Pune sex racket : पुण्यात मसाज पार्लरमध्ये सुरू होता वेश्याव्यवसाय, सामाजिक सुरक्षा विभागाचा छापा; ६ तरुणी ताब्यात

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गव्हाण येथील काशीद कुटुंब हे साताराहून विटाकडे येत होते. आज सकाळी विट्याहून महाबळेश्वर राज्य मार्गावरून साताऱ्याकडे खाजगी ट्रॅव्हल्सने एक बस निघाली असता शिवाजीनगर या ठिकाणी असलेल्या तीव्र उतारावर दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली. या अपघातात कार मधील चौघांचा मृत्यू झाला.

सुदैवाने गाडीत असणारी एअर बॅग वेळीच उघडल्याने गाडीतील एक व्यक्ती बचावला. या अपघातानंतर विटा-सातारा मार्गावरील वाहतूककोंडी झाली. या घटनेची माहिती मिळताच विटा पोलिस घातस्थळी आले. त्यांनी तातडीने मृतदेह कार कडून काढून विटा येथील एका रुग्णालयात पाठवले. दरम्यान, अपघातग्रस्त वाहन कार बाजूला घेऊन या मार्गावरील वाहतूक कोंडी दूर करण्यात आली.

IPL_Entry_Point

विभाग