मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune Accident: कात्रज नवीन बोगद्याजवळ विचित्र अपघात; तीन कारच्या धडकेत सहा जण जखमी

Pune Accident: कात्रज नवीन बोगद्याजवळ विचित्र अपघात; तीन कारच्या धडकेत सहा जण जखमी

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Mar 06, 2023 11:53 AM IST

Road Accident: पुण्यातील कात्रजच्या नवीन बोगद्याजवळ तीन कारच्या अपघातात सहा जण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे.

Road Accident
Road Accident (HT)

Pune Road Accident: कात्रज नवीन बोगद्याच्याजवळ रविवारी दुपारी तीन कारचा विचित्र अपघातात घडला. या अपघतात सहा जण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

रविवारी दुपारी तीन वाजताच्या सुमारास पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या तीन कारमध्ये विचित्र अपघात घडला. या अपघातात सहा जण जखमी झाले असून त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी फुटलेल्या काचांचा खच ,अस्ताव्यस्त पडलेले गाड्यांचे पार्ट,पलटी झालेल्या गाड्या आणि गाडीतून जिवाच्या आकांताने अपघातग्रस्तांनी फोडलेला टाहो पाहून प्रत्यक्षदर्शीना धडकी भरली. या अपघाताची माहिती मिळताच भारती विद्यापीठ पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली.

दरम्यान, दुपारी तीन वाजताच्या सुमारास हा अपघात घडला. त्यानंतर अपघातग्रस्तांना मदत करण्यासाठी स्थानिक धावून गेले. याशिवाय, पोलिसांनाही या अपघाताची माहिती देण्यात आली. काही लोकांनी अपघातग्रस्तांना बाहेर काढण्यासाठी मदत केली.तर, काही फोटो आणि व्हिडिओ काढण्यात व्यस्त होते, अशी माहिती प्रत्यक्षदर्शीने दिली आहे.

 

IPL_Entry_Point