मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Railway Accident : इगतपुरीजवळ मालगाडी रुळावरून घसरली; तात्काळ मदत केल्यानं मोठा अनर्थ टळला

Railway Accident : इगतपुरीजवळ मालगाडी रुळावरून घसरली; तात्काळ मदत केल्यानं मोठा अनर्थ टळला

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Sep 21, 2022 09:32 AM IST

Railway Accident : मालगाडी रुळावरून खाली घसरल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. ही मालगाडी कसाऱ्यावरून नाशिकच्या दिशेनं येत असताना हा अपघात घडला आहे.

railway accident today in nashik
railway accident today in nashik (HT)

railway accident today in nashik : मध्य रेल्वे मार्गावर मध्यरात्री मालगाडी रुळावरून खाली घसरून मोठा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. या अपघातात कोणतीही जीवीतहानी झाली नाही. परंतु या अपघातामुळं काही वेळ वाहतूक खोळंबली होती. त्यानंतर रेल्वे प्रशासनानं घटनास्थळी अपघात टीम पाठवल्यानं मोठा अनर्थ टळला. कारण बचाव पथकानं युद्धपातळीवर काम करत मालगाडीला पुढच्या दिशेनं प्रवासासाठी रवाना केलं. याशिवाय वाहतूक कोंडीही फोडली. त्यामुळं आता रेल्वेच्या सतर्कतेमुळं मोठा अनर्थ टळला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कसाऱ्यावरून नाशिकच्या दिशेनं येत असलेल्या मालगाडीला इगतपूरीनजीक अपघात झाला. त्यात मालगाडीचं चाक रुळावरून खाली घसरल्यानं मालगाडीची एक बोगी रुळावरून थेट रस्त्यावर गेली. या घटनेत कोणतीही जीवीतहानी झाली नसून यामुळं रस्त्यावर वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर या घटनेची माहिती मिळताच रेल्वेच्या टीमनं तात्काळ घटनास्थळी पोहचून मालगाडीला दुरुस्त करून तिला पुढच्या मार्गासाठी रवाना केलं. त्यानंतर नाशिक-दौंड महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे.

दरम्यान काही दिवसांपूर्वीच सोलापूरातील करमाळ्याजनजीक एका मालगाडीला अपघात झाला होता. त्यावेळी मालगाडी रेल्वेरुळावरून खाली घसरून एका शेतात घुसली होती. त्यानंतर आता इगतपूरीजवळही मालगाडी रुळावरून घसरल्याची घटना समोर आल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

IPL_Entry_Point

विभाग