मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune Road Accident: पुण्यात दोन मालवाहू ट्रकमध्ये भीषण धडक; दोन जण जखमी

Pune Road Accident: पुण्यात दोन मालवाहू ट्रकमध्ये भीषण धडक; दोन जण जखमी

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Mar 05, 2023 11:28 AM IST

Road Accident: मुंबई-बंगळुरू महामार्गावर आज सकाळी झालेल्या दोन मालवाहू ट्रकच्या भीषण धडकेत दोन जण जखमी झाले आहेत.

Road Accident
Road Accident

Mumbai-Bangalore highway Road Accident: मुंबई-बंगळुरू महामार्गावर आज सकाळी दोन मालवाहू ट्रकमध्ये भीषण धडक झाली. या अपघात दोन जण गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. आज सकाळी ६.३० वाजताच्या सुमारास हा अपघात घडला. या अपघाताची माहिती मिळताच अग्निशमनदलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन दोन जणांची सुटका केली. याप्रकरणी स्थानिक पोलीस अधिक तपास करीत आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई-बंगळुरू महामार्गावरील महिंद्रा शोरूम समोर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला मुंबईकडून साताराकडे जाणाऱ्या मार्गावर मागील बाजूने दुसऱ्या ट्रकने धडक दिली. या अपघात वाहनचालक आणि त्याच्यासोबत असलेला सहकाऱ्याचे दोन्ही पाय पुढे अडकल्याने ते जखमी अवस्थेत ट्रकमध्ये अडकले होते. त्याचवेळी अग्निदलाच्या जवानांनी तत्परतेने अग्निशमन बचाव साहित्याचा वापर करुन सुमारे वीस मिनिटात दोन्ही जखमींना बाहेर काढले. त्यांना तातडीने ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींच्या पायाला मोठ्या प्रमाणात दुखापत झाली आहे.

दत्तू आंबू गोळे (वय, ६०) आणि सुरज सुर्वे (वय, ३०) अशी जखमींची नावे असून ते सातारा भागातील रहिवाशी असल्याचे समजते. या कामगिरीत अग्निशमन अधिकारी शिवाजी मेमाणे, वाहनचालक लतेश चौधरी व तांडेल विष्णू राऊत आणि जवान ज्ञानदेव गोडे, अब्दुल पटेल, सुरेश इष्टे तसेच मदतनीस जवान औंकार देशमुख, विकास कुटे यांनी सहभाग घेतला.

IPL_Entry_Point

विभाग