Pune Crime News Marathi : पुण्यातील रास्ता पेठेत चोरी झाल्याची घटना ताजी असतानाच आता शहरातून आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अवैधरित्या पिस्तूल बाळगल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी एका गुंडाला कोंढव्यातून अटक केली आहे. त्यामुळं शहरात खळबळ उडाली असून पुण्यातील कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीकडून दोन पिस्तूल, चार काडतुसे जप्त केल्याची माहिती आहे. त्यानंतर आता या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे. पिस्तूल बाळगून काही तरी घडवण्याचा डाव आरोपींचा होता, असा संशय व्यक्त केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील कोंढवा परिसरातल्या खडी मशीन चौकात आरोपी तुळशीराम शहाजी उघडे हा पिस्तूल घेवून उभा होता. आरोपीच्या हातातील पिस्तूल पाहून एका व्यक्तीने या प्रकरणाची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलीस कर्मचारी विशाल मेमाणे यांनी सहकारी पोलिसांसह तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी सापळा रचून आरोपी तुळशीराम शहाजी उघडे याला अटक केली आहे. याशिवाय त्याच्याकडून दोन पिस्तूल आणि काडतूसेही पोलिसांनी जप्त केली आहे. त्यानंतर आता कोंढव्यात पिस्तूल विक्री करणारं मोठं रॅकेट सक्रीय असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीवर यापूर्वी वेगवेगळ्या प्रकरणांत गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे. त्यानंतर आता त्याला अवैधरित्या पिस्तूल बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. त्यामुळं आता पोलिसांच्या कारवाईचं अनेकांनी कौतुक केलं आहे. कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली असून आरोपींवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.
संबंधित बातम्या