मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune Crime : लोणीकाळभोर ऑईल डेपोतून लाखो लिटर पेट्रोल-डिझेलची चोरी

Pune Crime : लोणीकाळभोर ऑईल डेपोतून लाखो लिटर पेट्रोल-डिझेलची चोरी

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Aug 18, 2022 06:22 PM IST

pune crime news update : भारत पेट्रोलिमच्या पुण्यातील लोणीकाळभोर येथील ऑइल डेपोतून रोज लाखो रुपयांच्या पेट्रोल आणि डिझेलची चोरी होत असल्याचे गुन्हे शाखेच्या पथकाने उघडकीस आणले आहे. याप्रकरणी १० जणांना अटक करण्यात आली आहे.

pune crime
pune crime

 पुणे:पुण्यातील लोणी काळभोर येथील भारत पेट्रोयलियमच्या डेपोतून मोठ्या प्रमाणात ऑइल तस्कर हे पेट्रोल आणि डिझेलची चोरी करत असल्याचा प्रकार गुन्हे शाखेने उघडकीस आणला आहे. ही चोरी कंपनीतील काही कर्मचारी करत असल्याचा संशय असून या प्रकरणी पोलिसांनी १० जणांना अटक केली आहे. या प्रकरणाची दखल घेत पुण्यातील पेट्रोल डिझेल असोसिएशनने याची तक्रार थेट पेट्रोलियम मंत्र्यांकडे केली आहे.

हवलेली तालुक्यातील लोणी काळभोर येथे भारत पेट्रोलियम, हिंदुस्तान पेट्रोलियम आणि इंडियन ऑइल या तीन सरकारी कंपन्यांचे ऑइल डेपो आहेत. या ठिकाणी ऑइल साठवून येथून पुणे पिंपरी आणि जवळच्या जिल्ह्यांना त्याचा पुरवठा केला जातो. पेट्रोल आणि डिझेलच्या ट्रकमधून ही वाहतून केली जाते. मात्र, या ट्रक मधून काही प्रमाणात पेट्रोल आणि डिझेल काढून त्याची तस्करी होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्या नुसार गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून काहींना रंगे हात पकडले. 

या टँकर मधून बादल्यांच्या साह्याने पेट्रोल काढून त्याची चोरी केल्या जात होती. पोलिसांनी या प्रकरणी १० जणांना अटक केली आहे. रोज एका टँकर मधून १ लाख रुपयांच्या पेट्रोलची चोरी होत असल्याची माहिती आरोपींनी पोलिसांना दिली. हिंदुस्थान पेट्रोलियम आणि इंडियन ऑइल या इतर दोन कंपन्यांच्या शेजारीच असलेल्या डेपोमधून देखील चोरी होत असल्याचा संशय पोलिसांना आहे. यात या कंपण्याचे कर्मचारी तथा अधिकारी असल्याचा सांशीही व्यक्त केला जात आहे. दरम्यान, या प्रकरणाची गंभीर दाखल घेण्याची मागणी पेट्रोल पंप चालकांच्या संघटनांनी केंद्र सरकारला केली आहे.

IPL_Entry_Point

विभाग