मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  pune dahi handi: दहीहंडी उत्सवासाठी पुण्यातील वाहतूक व्यवस्थेत बदल; 'हे' मार्ग राहणार बंद

pune dahi handi: दहीहंडी उत्सवासाठी पुण्यातील वाहतूक व्यवस्थेत बदल; 'हे' मार्ग राहणार बंद

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Aug 19, 2022 12:39 PM IST

pune dahi handi 2022 : पुण्यात आज दहीहंडी महोत्सवानिमित्त होणारी गर्दी बघता वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे.

पुणे न्यूज
पुणे न्यूज

pune dahi handi 2022: पुण्यात आज दहीहंडीचा सोहळा रंगणार आहेत. या सोहळ्यासाठी होणारी गर्दी पाहता आज वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे. सायंकाळी पाच पासून शहरातील प्रमुख मार्गावरील वाहतूक ही बंद ठेवली जाणार आहे. यामुळे नागरिकांनी पर्यायी रस्त्याचा वापर करावा, असे वाहतूक विभागाचे पोलिस उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी केले आहे.

पुण्याच्या मध्यवर्ती भागात दहीहंडीचा महोत्सव हा मोठा असतो. हा सोहळा पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक येत असतात. नवी पेठ, साहित्य परिषद चौक, मंडई चौक बाबू गेनू, बुधवार चौक ते आप्पा बळवंत चौक, बेलबाग चौक ते सेवासदन, बुधवार चौक ते दत्त मंदिर चौक या परिसरात प्रामुख्याने गर्दी असते. यामुळे या ठिकाणी होणारी गर्दी पाहता हा वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोन्या मारुती चौककडून लक्ष्मी रस्त्याने सरल सेवासदन चौकाकडे जाणारा रस्ता बंद ठेवण्यात येणार आहे. या रस्त्यावरील वाहने ही सोन्या मारुती चौकातून उजवीकडे वळून फडके हौद चौकातून पुढे जातील. रामेश्वर चौक ते शनिपार चौकाकडे येणारी वाहतूक बंद करण्यात येणार आहे. या साठी पर्यायी मार्गाचा वपर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तर बुधवार चौकाकडून आप्पा बळवंत चौकाकडे एकेरी वाहतूक सोडण्यात येणार आहे. आप्पा बळवंत चौकातून बुधवार चौकाकडे येणारी वाहतूक बाजीराव रस्त्याने सरळ पुढे सोडण्यात येणार आहे. स. गो. बर्वे चौकातून पुणे मनपा भवनकडे शिवाजी रस्त्याने जाणारी वाहने ही स. गो. बर्वे चौकातून जंगली महाराज रस्त्याने जशी राणी चौकत डावीकडे वळून पुढे जाणार आहे.

बाजीराव रस्त्यावर शिवाजीनगरकडे जाणाऱ्या वाहन चालकांसाठी पुरं चौकातून टिळक रस्त्याने अलका टॉकीज चौक तसेच पुढे एफसी रस्त्याने पुढे जातील. तर पूरम चौकातून सेनादत्त चौकाकडे पुढे जातील. तर शिवाजी रस्त्यावरून स्वारगेटला जाणारी वाहने ही स. गो. बर्वे चौकातून जंगली महाराज रस्त्याने खंडोजीबाबा चौक, टिळक चौक पुढे टिळक किंवा शास्त्री रस्त्याने पुढे जातील.

IPL_Entry_Point

विभाग