मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune Crime : खळबळजनक ! पेट्रोलची नशा करू नका म्हटल्याने चार अल्पवयीन मुलांनी तरुणावर केले कोयत्याने वार

Pune Crime : खळबळजनक ! पेट्रोलची नशा करू नका म्हटल्याने चार अल्पवयीन मुलांनी तरुणावर केले कोयत्याने वार

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Sep 29, 2022 02:51 PM IST

Pune crime news : पुण्यात एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. एका तरुणाने पेट्रोलची नशा कारणाऱ्या तरुणांना नशा करू नका असा सल्ला दिल्याने त्याचा राग आल्याने चार अल्पवयीन मुलांनी त्या तरुणावर कोयत्याने वार केल्याची घटना उघडकीस आली आहे.

Pune crime
Pune crime (HT_PRINT)

पुणे : व्यसनाच्या आहारी गेल्यानंतर व्यसनाधीनांना व्यसन सोडविण्यापासून परावृत केले तर संबंधित व्यक्तिचा राग हा व्यसनाधीन लोकांना येत असतो. त्यातूनच ते गुन्हेगारी कृत्य करत असल्याच्या घटना घडत असल्याचे आपल्याला दिसते. असाच एक प्रकार पुण्यात उघडकीस आला आहे. पेट्रोलची नशा करताना हटकल्याच्या रागातून ३० वर्षीय तरुणावर चौघा अल्पवयीन मुलांनी कोयत्याने वार करुन त्याला गंभीर जखमी केल्याची घटना उघडकीस आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुलांनी त्यांच्या जवळील शाळेच्या सॅक मध्ये कोयता आणून हा हल्ला केला आहे. याप्रकरणी तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आदेश सुरेश सोनवणे (वय ३०, रा.धायरी, पुणे) असे या घटनेत जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलीसांनी पाच अल्पवयीन मुलांवर सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. १६ वर्षांच्या दोन आणि १३ वर्षाच्या एका मुलाला अटक करण्यात आली आहे. ही घटना बुधवारी (दि २८) धायरी परिसरातील धायरेश्वर मंदिरा जवळ शौकीन पान याठिकाणी घडली. तक्रारदार आदेश सोनवणे याच्या घराजवळ राहणारा १३ वर्षांचा मुलगा पेट्रोलची नशा करीत असताना एक महिन्यापूर्वी दिसला होता. यावेळी त्याने त्या मुलाला हटकले होते. तसेच त्याच्या पाठीत हाताने फटका मारला होता. त्याचा राग मनात धरुन या १३ वर्षाच्या मुलाने त्याच्या इतर अल्पवयीन साथीदारांसह संगनमताने आदेशला मारण्याचा कट रचला. बुधवारी आदेश सोनवणे यास गाठत, त्याला भेटल्यावर ‘ काय रे दादा ओळखतोस का मला?’ असे म्हणून त्याच्या सोबत असलेल्या १६ वर्षाच्या एका मुलाने अचानक कंबरेस खोवलेला कोयता काढून सोनवणे याच्या डोक्यावर वार केला. आदेशने हा वार उजव्या हाताने अडविण्याचा प्रयत्न केला. यात तो गंभीर जखमी झाला. त्याचवेळी दुसऱ्या एका अल्पवयीन मुलाने शाळेच्या सॅक मधून आणलेला दूसरा कोयता काढत आदेशच्या पाठीमागून डोक्यावर वार करुन शिवीगाळ करत ‘याला आज जिवंत सोडायचा नाय, मारुन टाका आमच्या नादाला लागतो काय’ असे म्हणून गंभीर जखमी करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करत सदर परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. या घटनेची माहिती मिळताच, सिंहगड रोड पोलीसांसह वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी परिस्थितीची पाहणी करत तीन अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतले आहे.

 

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या

विभाग