मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Kesari Tours : केसरी टूर्सला न्यायालयाचा दणका; ग्राहकाचे पैसे व्याजासह परत करण्याचे आदेश

Kesari Tours : केसरी टूर्सला न्यायालयाचा दणका; ग्राहकाचे पैसे व्याजासह परत करण्याचे आदेश

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Sep 28, 2022 09:36 AM IST

kesari tours and travels : तक्रारदार मंगेश ससाणे यांनी केसरी टूर्सकडे ५५ हजारांची हनिमून ट्रीप बुक केली होती. परंतु ऐनवेळी घरातील एका व्यक्तीचा मृत्यू झाल्यानं ग्राहकाला ट्रीपला जाता आलं नव्हतं.

kesari tours and travels
kesari tours and travels (HT)

kesari tours and travels : केसरी टूर्स आणि एका ग्राहकाच्या न्यायालयीन लढाईत कोर्टानं केसरी टूर्सला मोठा धक्का दिला आहे. एका ग्राहकांनं केसरी टूर्सकडे ५५ हजारांची एक ट्रीप बुक केली होती. परंतु ऐनवेळी ग्राहकाच्या आजीचं निधन झाल्यानं त्याला ट्रीपला जाता आलं नाही. त्यामुळं ग्राहकानं केसरी टूर्सकडे ही ट्रीप रिशेड्यूल करण्याची विनंती केली, ज्याला केसरी टूर्सनं नकार दिला. त्यानंतर ग्राहकानं केसरी टूर्सविरोधात पुणे जिल्हा ग्राहक मंचाकडे धाव घेतली होती. त्यानंतर आता कोर्टानं केसरी टूर्सला मोठा धक्का दिला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगेश ससाणे यांनी हनिमून साठी ५५ हजार रुपये केसरी ट्रॅव्हल्स कडे जमा करून शिमला, कुल्लू आणि मनालीची सहल बुक केली होती. मात्र त्यापूर्वीच त्यांच्या आजीचं निधन झाल्यामुळं त्यांनी याबाबत केसरी टूर्सला माहिती दिली. याशिवाय बुकिंगची रक्कम पुढील ट्रीपसाठी उपयोगात आणण्याची विनंती केली. मात्र, त्यानंतर कंपनीनं त्यांना पुढील कोणत्याही ट्रीपबाबत कळवलं नाही व कोणतेही पैसे परत दिले नाहीत. त्यानंतर ससाणे यांनी ग्राहक न्यायालयात धाव घेतली होती.

त्यानंतर या प्रकरणाचा निकाल देताना न्यायालयानं केसरी टूर्सला व्याजासहित ५५ हजार रुपये ससाणे यांना परत करण्याचे आदेश पुणे जिल्हा ग्राहक मंचानं दिले. हा आदेश अध्यक्ष उमेश जवळीकर, सदस्य क्षितिजा कुलकर्णी, सदस्य संगीता देशमुख यांच्या मंचानं दिला आहे. ससाणे यांच्या वतीने अॅड. स्मिता माने, अॅड. प्रियांका मानकर यांनी वकील म्हणून काम पाहिलं.

IPL_Entry_Point

विभाग